PHOTOS : निरीक्षकांचा चाणाक्षपणा अन्‌ मोठे बिंगच फुटले! नव्या वर्षातील पहिलीच मोठी कारवाई... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

ट्रकमध्ये सुताच्या दोऱ्याचे बंडल असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, ट्रकचे मागील फाळके उघडल्यानंतर दोऱ्यांच्या बंडलाचे पोते ठेवलेले होते. मात्र निरीक्षक फुलझळके यांना मिळालेली खबर पक्की असल्याने त्यांनी पथकातील जवानांना ट्रकवर चढविले आणि आतमध्ये पाहण्यास सांगितले असता बिंग फुटले. ट्रकच्या पाठीमागे सुताच्या दोऱ्यांच्या बंडलांचे पोते होते तर त्यापाठीमागे प्लायवूडने लहान कंटेनरच्या आकाराचा बॉक्‍स करण्यात आलेला होता. प्लाटवूड फोडले असता हे काय सापडले.

नाशिक : परराज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून जाणार असल्याची गोपनीय खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांना मिळाली होती. त्यानुसार, गेल्या रविवारी (ता.5) सीमावर्ती भागांमध्ये विभागाच्या पथकांनी नाकाबंदी केली होती. तर सायंकाळच्या सुमारास एक 16 चाकी ट्रक (एमएच 40 बीएल 4508) मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड मार्गे येऊन दिंडोरी तालुक्‍यातील जऊळके-वणीच्या दिशेने निघाल्याची खबर आली. त्यानुसार निरीक्षक फुलझळके यांच्या पथकाने पिंपळगाव-वणी सापुतारा रोडवरील गोंडेगाव फाटा येथे नाकाबंदी केली आणि संशयित ट्रक आला असता तो रोखला. ट्रकमध्ये विदेशी मद्याचे 945 बॉक्‍स पथकाच्या हाती लागले असून सदरचा मद्यसाठा 1 कोटी 4 लाख 33 हजार 700 रुपयांचा होता. मद्यसाठा आणि ट्रक असा सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. सदरची कारवाई विभागाचे उपायुक्त अर्जून ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, देवदत्त पोटे, एस.एस. रावते, दीपक आव्हाड, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके, गोकूळ शिंदे, अमन तडवी यांच्या पथकाने केली. 

No photo description available.

तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचा माल

हरियाणा, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याची 16 चाकी ट्रकमधून वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या पथकाने पकडला. सुताच्या दोऱ्यांचे बंडल ट्रकमध्ये असल्याचे भासविण्याची संशयितांची शक्कल विभागाचे चाणाक्ष निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांच्यामुळे उघडकीस आली आणि बंडलच्या पाठीमागे असलेल्या प्लायवूडच्या आतमध्ये तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचा विदेशी मद्याचे बॉक्‍स पथकाच्या हाती लागले. नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आहे. 

निरीक्षकांचा चाणाक्षपणा अन्‌ बिंग फुटले 
गोंडेगाव फाट्यावर ट्रक रोखताच चालकाने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला, तर दुसरा चालक पळत असताना त्याचा पाठलाग करीत अटक करण्यात आली. संशयित सतिश शिव सिंग (रा. खानापूर, धौलपूर, राजस्थान) याने ट्रकमध्ये सुताच्या दोऱ्याचे बंडल असल्याचे सांगितले. त्यानुसार, ट्रकचे मागील फाळके उघडल्यानंतर दोऱ्यांच्या बंडलाचे पोते ठेवलेले होते. मात्र निरीक्षक फुलझळके यांना मिळालेली खबर पक्की असल्याने त्यांनी पथकातील जवानांना ट्रकवर चढविले आणि आतमध्ये पाहण्यास सांगितले असता बिंग फुटले. ट्रकच्या पाठीमागे सुताच्या दोऱ्यांच्या बंडलांचे पोते होते तर त्यापाठीमागे प्लायवूडने लहान कंटेनरच्या आकाराचा बॉक्‍स करण्यात आलेला होता. प्लाटवूड फोडले असता, आतमध्ये हरियाणा आणि अरुणाचल प्रदेशामध्येच विक्रीसाठीचा विदेशी मद्याचे सुमारे 945 बॉक्‍स होते. गेल्या आठवड्यातही याच पथकाने सुमारे पाऊण कोटींचे मद्याचे स्पिरिटने भरलेला टॅंकर पकडला होता. 

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

बॉक्‍समध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात साठा असेल याचा अंदाज नव्हता

हरियाणातून मद्यसाठा आणून गुजरातकडे जात असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तपासातून स्पष्ट होईल. मात्र सुतांच्या बंडलांच्या आडमध्ये बसलेल्या बॉक्‍समध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात साठा असेल याचा अंदाज नव्हता. मोठीच कारवाई झाली आहे. - ऋषिकेश फुलझळके, वरिष्ठ निरीक्षक, राज्य उत्पादन विभाग.  

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegally travel Foreign liquor by truck seized Nashik Crime Marathi News