"लॉकडाउन''मध्ये अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'प्रोत्साहन भत्ता'...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

"लॉकडाउन''च्या काळात अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) केली जात आहे. या सेवार्थ कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना रोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. 

नाशिक : "लॉकडाउन''च्या काळात अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) केली जात आहे. या सेवार्थ कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना रोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. 

कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून अथक परिश्रम घेताय...

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्‍टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलिस, शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी अत्यावश्‍यक सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी महामंडळातर्फे बसगाड्या उपलब्ध असून, महामंडळाचे कर्मचारीही कर्तव्य बजावत आहेत. विशेषत: मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड अशा विविध विभागांत महामंडळाचे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून अथक परिश्रम घेत आहेत. याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे श्री. परब यांनी सांगितले. 

हेही वाचा > 'होम क्वारंटाइन' असलेल्यांची यादी व्हायरल?...दोषींविरुद्ध कठोर कारवाई

विम्याच्या मागणीची पूर्तता अद्याप नाही 

डॉक्‍टरांना पन्नास लाखांचे विमाकवच देण्याची घोषणा यापूर्वी झाली आहे. याच धर्तीवर जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही विम्याचे कचव मिळावे, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

हेही वाचा > photo : ...अन् निवारा केंद्राला जिल्हाधिकारींची "सरप्राइज'' भेट....सोयी-सुविधांची पाहणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incentive allowance for essential service personnel nashik marathi news