esakal | "डॉ.आंबेडकरांच्या विचारांना मनुवादी विघातक वृत्ती धक्का लावू शकणार नाही" - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagn bhujbal 1.jpg

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारकडून कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

"डॉ.आंबेडकरांच्या विचारांना मनुवादी विघातक वृत्ती धक्का लावू शकणार नाही" - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारकडून कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

‘राजगृह’ तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह - छगन भुजबळ
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी एक महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केल जाईल. राज्यातील व देशातील नागरिकांनी संयम ठेवून शांतता पाळावी असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..