नवनिर्वाचित सभापतींनी पेलले उत्पन्न वाढीचे आव्हान; उत्पन्नात लाखोंची वाढ

योगेश मोरे
Thursday, 1 October 2020

कोरोनाचा परिणाम हा मोठमोठ्या उद्योगधंदेसह इतर क्षेत्रावर ही दिसून येतो. बाजार समितीस ऑगस्ट महिन्यात ७३ लाख ११ हजार ५२६ रूपये होते. सप्टेंबर महिन्यात १ कोटी १९ लाख ७० हजार पंचावन्न रुपये इतके झाले असून ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ४६ लाख ५८ हजार ५२९ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.

नाशिक : (म्हसरूळ) कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्यांचा परिणाम मोठमोठ्या उद्योगावर झाला होता. ऑगस्ट २०२० या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२० या  महिन्यात ४६ लाख ५८ हजार पाचशे एकोणतीस रुपयांनी वाढ झाल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती देविदास पिगळे यांनी गुरुवारी (ता. 1) रोजी दिली.

समितीची मार्केट फी हे मूळ उत्पन्न स्तोत्र...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, ठकांबे, पिंपळणारे, अक्राळे, तळेगाव, दरी मातोरी, माडसंगवी, शिंदे पळस तसेच शहरालगत असलेल्या म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, अंबड, सातपूर, नाशिक रोड, नांदूर मानूर येथून शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात घेऊन येत असतात. पर जिल्ह्यातुन कांदा, बटाटा, डाळींब इतर फळे अन्न धान्य देखील शरदचंद्रजी मार्केट यार्डात येत असतात. बाजार समितीचे मार्केट फी हे मूळ उत्पन्न स्तोत्र आहे. कोरोनाचा परिणाम हा मोठमोठ्या उद्योगधंदेसह इतर क्षेत्रावर ही दिसून येतो. बाजार समितीस ऑगस्ट महिन्यात ७३ लाख ११ हजार ५२६ रूपये होते. सप्टेंबर महिन्यात १ कोटी १९ लाख ७० हजार पंचावन्न रुपये इतके झाले असून ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ४६ लाख ५८ हजार ५२९ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

सभापतींनी उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान पेलले

बाजार समितीचे तत्कालीन सभापती संपतराव सकाळे यांनी रोटेशन पद्धतीने पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सभापती पदाची धुरा ही देविदास पिंगळे यांच्या हाती आली. बाजार समितीचे घटलेले उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान त्याचे समोर  उभे ठाकले होते. सहकार क्षेत्रात असलेला अनुभव प्रशासनाकडून काम करून घेण्याचे कौशल्य या जोरावरच पिंगळे यांनी बाजार फी व इतर उत्पन्न यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढवत आव्हान पेल्ल्याची चर्चा सहकारी संचालक मंडळ व सहकार क्षेत्रात सुरू आहे.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The income of Nashik Bazar Samiti increased nashik marathi news