निर्माल्य फेकल्याने नदीप्रदूषणात वाढ; महापालिकेकडून मात्र दुर्लक्ष

nirmalya.jpg
nirmalya.jpg

नाशिक रोड : नवारात्रोत्सवानिमित्त घरोघरी घटस्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा दिवसांचे पूजेचे निर्माल्य भाविकांनी दसक, पंचक, नांदूर, मानूर, येथे गोदावरी, देवळालीगाव, विहितगावमध्ये वालदेवी, चेहेडी, कोटमागाव, सामनगाव, पळसे, येथे दारणा नदीत टाकल्याने मोठ्या प्रमाणात नदीप्रदूषण झाले आहे. 

प्रत्येक प्रभागात निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र गाडी
दसक येथील संत जनार्दन स्वामी पुलावर आणि टाकळी येथील मलनिस्सारण केंद्राजवळील पुलावर दिवसभर निर्माल्य टाकण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही सामाजिक संस्था व महापालिकेचे कार्यकर्ते नव्हते. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होते. नगरसेवकांनी महापालिकेमार्फत या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्याची गरज होती. गणेशमूर्ती विसर्जनाप्रमाणे नदीकिनारी निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी कोणत्याही सामाजिक संस्थांही पुढाकार घेत नाहीत. महापालिकेने घंटागाडीप्रमाणे या दिवशी प्रत्येक प्रभागात निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र गाडी फिरवणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

सात वर्षांपासून गोदावरी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करीत आहोत. नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. निर्माल्य घरातील बागेत व कुंडी टाकावे. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. - राजेश पंडित, नमामि गोदा फाउंडेशन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com