वीज विभागाकडून स्वतंत्र ‘सीसीटीव्ही’चा घाट; एकाच कामावर दोनदा खर्च

cctv camera
cctv camera

नाशिक : स्मार्टसिटींतर्गत शहरात ८०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असताना महापालिकेच्या वीज विभागाने प्रभागांमध्ये स्वतंत्र कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे एकाच कामावर दोनदा होणारा खर्च महापालिकेला आर्थिक खर्चात पाडणारा ठरणार आहे. स्मार्टसिटींतर्गत कॅमेरे बसविले जात असताना नव्याने स्वतंत्ररीत्या कॅमेरे बसविण्याची गरजच काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

वीज विभागाकडून स्वतंत्र ‘सीसीटीव्ही’चा घाट

शहरातील कायदा व सुव्यवस्थेबरोबरच नजरेच्या एका टप्प्यात संपूर्ण शहर येण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेवरून शहरात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात आठशे कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. स्मार्टसिटी कंपनीऐवजी राज्य शासनाच्या आयटी विभागातर्फे कॅमेरे बसविण्याच्या सूचना भाजप सत्ताकाळात दिल्या होत्या. त्यासाठीचा सुमारे ७२ कोटींचा निधी स्मार्टसिटी कंपनीने वर्गही केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर कमांड कंट्रोल सेंटरची (सीसीसी) उभारणी झाली असून, त्यावर सध्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांवर वॉच ठेवला जात आहे.

एकाच कामावर दोनदा खर्च; महापालिकेला आर्थिक भुर्दंड

टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात कॅमेरे बसविताना कमांड कंट्रोल सेंटरशी जोडले जाणार आहे. त्याव्यतिरिक्त खासगी ठिकाणी बसविलेले कॅमेरेही कमांड कंट्रोल सेंटरच्या सर्व्हरला जोडून शहराचा कानाकोपरा स्क्रीनवर आणण्याचे नियोजन असताना वीज विभागाने प्रभागांमध्ये खासगीरीत्या कॅमेरे लावण्यास सुरवात केल्याने एकाच कामासाठी दोनदा खर्च करण्याची तयारी दाखविल्याने ही भूमिका संशयास्पद ठरत आहे.

वीज विभागाची भूमिका संशयास्पद
वीज विभागाने सिडकोतील प्रभाग २५ मधील गाडगे महाराज उद्यान, पाटीलनगर क्रीडासंकुल, सुभाषचंद्र बोस उद्यान व सूर्योदय उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. स्मार्टसिटीमार्फत कॅमेरे बसविण्याच्या स्पष्ट सूचना असताना वीज विभागाचा हा खर्चिक प्रयोग संशय निर्माण करणारा ठरत आहे.

संपादन : रमेश चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com