मुलांना अनुभवातून 'जीवन शिक्षणाचे धडे' मिळावेत यासाठी 'या' शाळेने लढविली वेगळीच शक्कल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना सुटी असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांना अनुभवातून जीवन शिक्षणाचे धडे मिळावेत, या उद्देशाने नाशिकमधील इस्पॅलियर स्कूलने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना सुटी असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांना अनुभवातून जीवन शिक्षणाचे धडे मिळावेत, या उद्देशाने नाशिकमधील इस्पॅलियर स्कूलने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

शिक्षकांकडूनही मोबाईल ऍपद्वारे अध्यापन

विद्यार्थी व पालकांसाठी इस्पॅलियर स्कूलने विशेष मोबाईल ऍप तयार केले असून, शिक्षकांकडूनही मोबाईल ऍपद्वारे अध्यापन केले जात आहे. विद्यार्थी आपापल्या घरी राहूनच अध्ययनाचे धडे गिरवत आहेत. या मोबाईल ऍपद्वारे विद्यार्थ्यांना पुढील महिनाभराचे अभ्यासाचे वेळापत्रकच तयार करून देण्यात आले आहे. शाळेप्रमाणेच विद्यार्थ्यांनी घरी राहून कशा प्रकारे अभ्यास करायचा याचे नियोजन करून देण्यात आले आहे. अभ्यासाव्यतिरिक्त आई-वडिलांना दैनंदिन कामात मदत करण्यासाठी मुलांना आवाहन करण्यात आले आहे. मुला आईला चहा-पाण्यापासून तर भाजी चिरणे, पोळ्या बनविणे ही सर्व घरकामे करीत आहेत. विद्यार्थीही अनुभवातून शिक्षण घेत आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे खास एमसीक्‍यूवर आधारित 50 गुणांची प्रश्‍नपत्रिका मोबाईल ऍपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनीही हे प्रश्‍न ऍपद्वारे सोडविण्याची सुविधा यात आहे. 

Image may contain: 1 person

आई-वडिलांना दैनंदिन कामात मदत

शिक्षकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांकडून अध्ययन केले जात आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी घरातच राहून आई-वडिलांना दैनंदिन कामात मदत करावी. अनुभवातून 
शिक्षण देण्याच्या या उपक्रमाला पालकांकडून चांगली दाद मिळत आहे. शिक्षक घरबसल्या रोजचे शोधून पाठवत आहेत, त्यांना विविध उपक्रम ऍक्‍टिव्हिटी पाठवत आहेत. शिक्षक स्वतःचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकून मोबाईलच्या माध्यमातून लिंक 
पाठवतात याच्यातून मुलांना शिक्षकांचा संपर्क राहतो. 

Image may contain: 1 person, food and indoor

कौशल्याचा वापर करत बनविले 50 मास्क
 
इस्पॅलियर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच अनुभवावर आधारित प्रात्यक्षिक तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध अभिनव उपक्रमही राबविले जातात. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर शाळेतील युग लोहाडे या विद्यार्थ्याला टेलरिंग व शिलाईचे प्रशिक्षण घेऊन 50 मास्क तयार केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी युग लोहाडेने घेतलेला हा पुढाकार इतर मुलांसाठीही प्रेरणादायी असाच आहे. 

Image may contain: 2 people, people sitting

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

Image may contain: 3 people, people sitting

अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली जात आहेत. भाषणकलेबरोबरच वक्तृत्वाचे धडे घेत आहेत. तसेच योगासने, ध्यानधारणा याद्वारे 
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोबाईल ऍपद्वारे विद्यार्थ्यां ना मेडिटेशन कशा पद्धतीने करावचे याचे व्हिडिओही पाठविले जाणार आहेत. शास्त्रसंगीताचे रेकॉर्डिंग व्हिडिओ ऍपद्वारे उपलब्ध झाल्याने विद्यार्थी घरातच संगीताचे प्रशिक्षण घेत आहेत. सृजनात्मक कलेसाठी विद्यार्थी खास वर्कशीटवरील कलाकुसरीची कामे करत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मिळालेली ही सुटी केवळ मौजमजा करण्यासाठी नाही तर या सुट्यांमध्ये घरीच राहून अनुभवातून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेता येणे शक्‍य असून, इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. - सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक, इस्पॅलियर स्कूल  

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative initiative of the Espalier School nashik marathi news