जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक...जीवितहानी झाल्यास संबंधित मालक किंवा भाडेकरूवर जबाबदार 

विक्रांत मते
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेने आता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेने नेमून दिलेल्या संरचना अभियंत्यांच्या माध्यमातून परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत​.

नाशिक : शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेने आता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेने नेमून दिलेल्या संरचना अभियंत्यांच्या माध्यमातून परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुदतीच्या आत इमारतींचे परीक्षण न झाल्यास २५ हजार रुपये दंड किंवा मालमत्ता कराएवढी रक्कम मिळकतधारकाला मोजावी लागणार आहे.

वाड्यांबरोबरच सुस्थितीतील घरेही कोसळण्याच्या प्रमाणात वाढ

शहराचा विस्तार होत असताना इमारतींची संख्या वाढत आहे. जुने नाशिक, पंचवटी, नाशिक रोड विभागांतील देवळालीगाव व सातपूर गावात मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६५ (अ) नुसार महापालिका हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी इमारतींचे घरमालक किंवा भोगवटदारांना त्यांच्या मालकीच्या मिळकतचे सर्वेक्षण करून इमारतीचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे की नाही, याचा अहवाल महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने नोटीस काढून संरचनात्मक परीक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या इमारतींचे वय तीस किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल टेक, संदीप पॉलिटेक्निक या संस्थांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

जीवितहानी झाल्यास संबंधित मालक किंवा भाडेकरूवर जबाबदार 

या संस्थांकडून स्‍ट्रक्चरल ऑडिट करताना २३ रुपये प्रतिचौरस मीटर व अधिक किमान पाच हजार रुपये सर्व्हिस चार्जेस असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. वाढत्या धोकादायक इमारतींवरून निर्णय पावसाळ्यात वाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आता वाड्यांबरोबरच सुस्थितीतील घरेही कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. मुदतीत संरचनात्मक परीक्षण न केल्यास व संबंधित मिळकत पडून जीवितहानी झाल्यास संबंधित मालक किंवा भाडेकरूवर जबाबदारी राहणार असल्याची ताकीद देण्यात आली आहे.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions for structural audit to old buildings nashik marathi news