ब्रेकिंग : कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून व्यक्तीला शिवीगाळ; लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा अमानुष प्रकार

corona fear 123.jpg
corona fear 123.jpg

नाशिक / सिडको : "तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही इथे कसे राहतात" असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा निशान त्याने हातातील फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोळ्यावर मारुन दुखापत केली. ​

असा घडला प्रकार

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, सिडकोतील महाले फार्म येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस त्याच्या शेजारी राहणाऱ्या, अप्पा मोतीराम बाच्छाव त्यांची दोन मुले निशांत व प्रशांत पत्नी तसेच दोन्ही सूनांनी सदर इसमास तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही इथे कसे राहतात असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा निशान त्याने हातातील फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोळ्यावर मारुत दुखापत केली. फिर्यादीचा मुलगा हा  सोडविण्यास आला असता त्याला देखील मारहाण केली, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 गुन्हा दाखल

कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या इसमाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय बेडवाल करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com