PHOTOS : द्विधा मनस्थितीत डोळे पाणावले! काम सुटल्याची खंतही अन् घराची ओढ ही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

एकीकडे घराची ओढ तर दुसरीकडे हाताचे काम सोडून जाताना मजुरांचे डोळे पाणावले होते. गावोगावी तलाठी कार्यालयात परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी या सर्व मजुरांना येथील बस स्थानकावर आणण्यात आले. आगारात मंगळवारी परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसेस सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आल्या होत्या. 

नाशिक : (येवला) दोन महिन्यांपासुन बाहेर भटकंती सुरू आहे..आता केव्हा बस निघेल अन केव्हा घरी पोहोचू अशी हुरहूर दोन दिवसापासून मनात लागली होती. अखेर बुधवारी (ता.13) सकाळी येथील बसस्थानकावर परप्रांतीय मजूर बसमध्ये बसले अन बस सुरू झाली तेव्हा घराकडे जाण्याच्या ओढीने त्यांचे डोळेही पाणावले होते. 

हाताचे काम सोडून जाताना वाईटही वाटले...

उत्तरप्रदेश ,बिहार आणि राजस्थानातील परप्रांतीय 340 मजुरांना परिवहन खात्याच्या 13 बसमधून बुधवारी प्रशासनाच्या वतीने रवाना करण्यात आले. एकीकडे घराची ओढ तर दुसरीकडे हाताचे काम सोडून जाताना मजुरांचे डोळे पाणावले होते. गावोगावी तलाठी कार्यालयात परप्रांतीयमजुरांची नोंदणी करण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी या सर्व मजुरांना येथील बस स्थानकावर आणण्यात आले. आगारात मंगळवारी परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसेस सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन महिन्यानंतर ओस पडलेले बसस्थानक परप्रांतीय मजुरांच्या गर्दीने फुलून गेले होते. 

Image may contain: one or more people, people standing, shoes, crowd and outdoor

Image may contain: 1 person, standing

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...

Image may contain: 1 person, standing and outdoor

Image may contain: one or more people, people sitting, shoes, child and outdoor

Image may contain: 1 person, standing, shoes and outdoor

मध्यप्रदेश येथील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी 3 बसेस मधून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सोडण्यात आले यावेळी आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चालक लासुरे यांचा सत्कार करण्यात येऊन बस रवाना झाल्या. यावेळी वीर सावरकर संस्थचे श्रावण जावळे, आनंद शिंदे आदींसह सोशल फोरम संघटनेतर्फे परप्रांतीय मजुरांच्या नाश्‍ता व पाण्याची सोय केली. 

हेही वाचा >नियतीचा क्रूर डाव! कामधंदा नाही म्हणून कुटुंबासह निघाला गावी..पण कसारा घाटातच "त्याचा" काळ उभा होता..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The intense desire to go home brought tears to the eyes of the workers nashik marathi news