नांदगाव हत्याकांड : पोलीसांच्या श्वानाने दाखवला मार्ग;  घटनेतील धागेदोरे लवकरच येणार समोर

nandgaon murder 123.jpg
nandgaon murder 123.jpg

नाशिक / नांदगाव : नांदगाव वाखारीच्या जेऊर शिवारात शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री समाधान चव्हाण व त्यांच्या चौकोनी कुटुंबीयांच्या खळबळजनक  हत्याकांडामुळे आजही सलग दुसऱ्या दिवशीदेखील  पंचक्रोशीतील गावकरी सावरलेले नव्हते. अनामिक भीती, दडपण, दबक्या आवाजातल्या  चर्चा अशा वातावरणात हत्याकांडानंतरचा दुसरा दिवस मावळला.

श्‍वानाने दाखवला मार्ग

सर्वसामान्य समाधान चव्हाण यांच्या आप्तस्वकीयांसह मित्रपरिवार व परिसरातील तब्बल चाळीस जणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण व नांदगाव पोलिसांच्या पथकाने चौकशी केली. श्‍वानाने जेऊर रस्त्यावर तलावापर्यंतचा मार्ग दाखविला आहे. पोलिस त्या मार्गावरदेखील शनिवारी (ता. ८) गेलेत. समाधान व त्यांच्या परिवारात असलेल्या मोबाईलवर आलेले व केलेल्या कॉल्सचे डिटेल प्राप्त करण्याचे काम करण्यात आले. मात्र, ठोस अशी धागेदोरे मिळाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

धागेदोरे गवसणार

शुक्रवारी (ता. ७) जेऊर रोडवरील  समाधान अण्णा चव्हाण (वय  ३७) व पत्नी भरताबाई चव्हाण (वय ३२), मुलगा गणेश चव्हाण (वय ४) व मुलगी आरिया (वय ६) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.  नाशिक स्थानिक गुन्हे अन्वेषण व पोलिसांच्या विविध स्तरांवरील शोधपथकाच्या वाहनांनी  तपासाची गतिमानता  दिसून आली. हत्येमागच्या कारणांचा आज शोध घेण्यासाठी चौकशीसत्र  राबविण्यात आले. वाखारी,  चौकटपाडे, जेऊर  आदी परिसरात वेगवेगळ्या चाळीसहून अधिक लोकांच्या गाठीभेटीतून  पोलिसांनी शक्यतांची पडताळणी केली. घटनेतील धागेदोरे गवसण्यासाठी माहितीगार  व खबरे सतर्क करण्यात आले.

आप्तस्वकीयांसह चाळीस जणांची चौकशी 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नांदगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पंचक्रोशीतल्या गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींचाही आढावा घेतला. गावात पोलिस वाहनांचा ताफा आज दिवसभर होता. वाखारी गावातल्या एका खोलीत चौकशीसाठी पोलिस काही नागरिकांना बोलवून घेत होते. त्यांच्याकडून चव्हाण कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली.  

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com