पुणे विद्यापीठाने 'त्या' निर्णयाचा करावा पुनर्विचार!

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सर्वच अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. गेल्या 28 फेब्रुवारीला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत कोरोना विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असल्याने पुणे विद्यापीठाला शुल्कवाढीच्या त्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सर्वच अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. गेल्या 28 फेब्रुवारीला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत कोरोना विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असल्याने पुणे विद्यापीठाला शुल्कवाढीच्या त्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

शिक्षणापासून मुकावे लागण्याची भीती

सद्यःस्थितीत वाढीव शुल्क भरणे शक्‍य नसल्याने अनेकांना शिक्षणापासून मुकावे लागण्याची भीती पालक-विद्यार्थ्यांकडून व्यक्‍त होत आहे. 
गेल्या सुमारे दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाने शुल्कात लक्षणीय वाढ केलेली नसल्याने आगामी शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या संदर्भातील सूचनादेखील जारी केली होती. विद्यापीठ प्रांगणात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, तसेच विद्यापीठाशी संलग्न अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व अभ्यासक्रमांच्या ट्यूशन फीमध्ये, तसेच प्रयोगशाळा शुल्कात वाढ जारी केली होती. 

वाढीव शुल्कवाढ मागे घ्यावी

प्रामुख्याने विनाअनुदानित तत्त्वावरील अभ्यासक्रमांच्या शुल्कात साधारणत: तीन पटींपर्यंत वाढ केलेली होती. परंतु फेब्रुवारीनंतर कोरोनाचा भारतात व विशेषत: महाराष्ट्रात, पुण्यात प्रादुर्भाव वाढत गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. सध्याच्या स्थितीत अनेक नोकऱ्या अडचणीत असताना, आपल्या पाल्याला शिकवायचे कसे, हा प्रश्‍न पालक वर्गापुढे उभा राहिला आहे. अशा स्थितीत विद्यापीठाने जाहीर केलेली शुल्कवाढ मागे न घेतल्यास अनेकांना इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ ओढावू शकते. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत विद्यापीठाने किमान पुढील शैक्षणिक वर्षात ही वाढीव शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी भावना यानिमित्त व्यक्‍त केली जाते आहे. 

ऍकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीकडे लक्ष 

आगामी वर्षातील शुल्कवाढीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची संधी आगामी ऍकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत असणार आहे. शनिवारी (ता. 23) ही बैठक होणार असल्याचे संकेत आहेत. सद्यःस्थिती लक्षात घेता झूम ऍपद्वारे ही बैठक पार पडेल. शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्यासह यंदाच्या सत्र परीक्षांचे शुल्कदेखील माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेणे आवश्‍यक असणार आहे. 

शुल्कवाढ केलेल्या अभ्यासक्रमांचा तपशील
 
विद्यापीठ प्रांगणातील अभ्यासक्रम (कॅम्पस डिपार्टमेंट) 
अनुदानित पदव्युत्तर पदवी (पीजी) : 12 
अनुदानित पदवी (यूजी) : 1 
विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी (पीजी) : 35 
विनाअनुदानित पदवी (यूजी) : 7 
डिप्लोमा अभ्यासक्रमांची संख्या : 26 
सर्टिफिकेट कोर्सची संख्या : 23 

 हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रम 

अनुदानित पदव्युत्तर पदवी (पीजी) : 8 
अनुदानित पदवी (यूजी) : 5 
विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी (पीजी) : 22 
विनाअनुदानित पदवी (यूजी) : 30 
डिप्लोमा अभ्यासक्रमांची संख्या : 12 
सर्टिफिकेट कोर्सची संख्या : 7  

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not possible to pay extra fees to all students; Pune University should reconsider nashik marathi news