..तर आज मी महाराष्ट्राचा पोलिस महासंचालक असतो"

jitendra awhad.jpg
jitendra awhad.jpg

नाशिक : मी शिकलो. त्यानंतर स्पर्धा परिक्षांची तयारी करीत राहिलो. विविध प्रयत्न केले. आयपीएस होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देखील दिली. त्यात मला केवळ दोन गुण कमी मिळाल्याने गुणवत्ता यादीत नाव हुकले. अन्यथा मी पोलिस अधिकारी बनलो असतो. कदाचीत आज महाराष्ट्राचा डीजी असतो. असे सांगत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपले मन मोकळे केले.

शिक्षण घेण्यात मागे पडू नका ​..

माझे आजोबा शंभर वर्षांपूर्वी गाव सोडून मुंबईला गेले. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावर हमाली करीत फलाटावरच राहिले. अगदी माझे वडील देखील जवळपास वीस वर्षे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरच राहिले. त्यामुळे आजही मला मुंबई सेट्रल रेल्वेस्थानक माझे घरच वाटते. आमच्या समाजाचे, तालुक्‍यातील अन्‌ गावातील असे असंख्य लोक तिथे हमाली करीत. थोडक्‍यात ती आमची मोनोपोली होती असे म्हणता येईल. मात्र त्यांनी आम्हाला शिकवले. शिक्षण घेण्यात मागे पडू नका असा त्यांचा ध्यास होता.मंत्री आव्हाड शनिवारी (ता.८) सायंकाळी ग्रामस्थांच्या निमंत्रणावरुन त्यांचे मूळ गाव पास्ते (सिन्नर) येथे आले होते. यावेळी गावाने त्यांचा वाजत गाजत सत्कार केला. यावेळी ते म्हणाले,

दोन गुण कमी मिळाल्याने नाव हुकले..

त्यानंतर ते म्हणाले, मी शिकलो. त्यानंतर स्पर्धा परिक्षांची तयारी तरीत राहिलो. विविध प्रयत्न केले. आयपीएस होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देखील दिली. त्यात मला केवळ दोन गुण कमी मिळाल्याने गुणवत्ता यादीत नाव हुकले. अन्यथा मी पोलिस अधिकारी बनलो असतो. कदाचीत आज महाराष्ट्राचा डीजी असतो.

यापुढे गावातील तरुणांनी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे.

आमच्या गावातही तरुण शिकत आहेत. पुढे येत आहेत. जवळपास दिडशे तरुण मुंबईत पोलिस झाले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर कुठेही चार पाच वाहतूक पोलिस असले अन्‌ त्यातील कोणी कधी काही कारणाने वाहन अडवले तर त्यातला एखादा हमखास पुढे येऊन सांगतो, अरे हे तर आपले गाववालेच आहे. जाऊ द्या त्यांना, त्यात एक आपलेपण आहे. बंधुभाव आहे. त्याचे समाधान वाटते. मात्र आता हमाल, पोलिस खुप झालेत. यापुढे गावातील तरुणांनी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे. यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत.

गावाशी माझी नाळ आजही जोडलेली ​
आठवणींत रमलेले आव्हाड म्हणाले, गावाशी माझी नाळ आजही जोडलेली आहे. या गावात शंभर वर्षापूर्वी पाणी नव्हते. आजही पिण्याच्या पाण्याची अडचण आहेच. त्यासाठी शेजारच्या इगतपूरी तालुक्‍यातील कडवा धरणातून पाणी आणले तर हा प्रश्‍न सुटेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार केला. यावेळी निवृत्त न्यायाधीश डी. पी. आव्हाड, उद्योजक अशोक आव्हाड, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी. पी. आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक काकड, बाळू पाटील आव्हाड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com