कळवण-मुंबई बसला गोंदे फाटा येथे अपघात; २५ प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

मुंबई - आग्रा महामार्गावर कळवणहून मुंबईकडे जात असलेल्या गोंदे फाट्याजवळ पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला बसने धडक दिली. यात बसमधील 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.

वाडीवऱ्हे (नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावर कळवणहून मुंबईकडे जात असलेल्या बसला गोंदे फाट्याजवळ पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला बसने धडक दिली. यात बसमधील 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

गुरुवारी (ता. 19) सकाळी 9.30 वाजता कळवण मुंबई बस क्रमाक MH.14.BT.3802 ही गोंदे दुमाला फाट्याजवळ आली. पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला बसने जोरदार धडक दिल्याने बसमध्ये बसलेले 20 ते 25 प्रवाशांना डोक्यास तोंडास व मार लागला. त्यांना जगद्गुरु नरेंद्रा्चा्र्य महाराज संस्थानची रूग्णवाहीका चालक निवृत्ती गुंड हे तात्काळ अपघात स्थळी पोहोचली. जखमी रूग्णांना नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयात ऊपचारासाठी दाखल केले. अपघातात जखमी झालेले प्रवाशी अरूण बाळु जाधव (वय 46), संगिता अरून जाधव (वय 38), शुभम अरून जाधव (वय 19, रा ठाणे), बबन शंकर गायकवाड (वय 65), वसंता दिलीप भोकरे (वय 60), निलेश महाबली भंडारी (वय 44), अनिता महाबली भंडारी (वय 70), अनिता आरेकर (वय 56), उमेश लक्ष्मन खाडे (वय 52) दिलीप बाबुराव डावखरे (वय 56), दिलीप मनोहर वानखडे (वय 50).

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalvan-Mumbai bus accident at Gonde Fata, 25 passengers injured nashik marathi news