''खासगी रुग्णालयातील देयके तपासणीसाठी लेखापरीक्षक नेमा'' - दादा भुसे

प्रमोद सावंत
Sunday, 4 October 2020

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होता कामा नये, यासाठी रुग्णालयाची देयके तपासणीकामी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.३) येथे दिले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

नाशिक : (मालेगाव) ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यात कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी उपयुक्त आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. केवळ औपचारिकपणे ही मोहीम राबवू नका. शहर व ग्रामीण भागातील खासगी मेडिकल दुकानांबाहेर कोरोनासाठी आवश्‍यक उपलब्ध औषधसाठा व त्यांच्या किमतींचे दर्शनी भागात फलक लावावेत. त्याची नियमित तपासणी करावी असे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले. 

लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनीही यात सहभाग नोंदवावा.

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होता कामा नये, यासाठी रुग्णालयाची देयके तपासणीकामी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.३) येथे दिले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. उपमहापौर नीलेश आहेर, घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. शैलेश निकम, प्रमोद शुक्ला आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनीही यात सहभाग नोंदवावा. जनजागृतीसाठी होर्डिंग्ज, बॅनर लावून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धई करावी. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

मोहीम पथकातील कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. सर्व नागरिकांची निकषाप्रमाणे तपासणी करावी. गृहभेटीला आलेल्या पथकांना नागरिकांनी वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शहर व तालुक्यातील दाखल कोविड रुग्ण, उपलब्ध औषधसाठ्यांची माहिती जाणून घेतली. कोरोनासाठी आवश्यक औषधांची कमतरता भासायला नको, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.  

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep an auditor to check the payments of private hospitals- Dada Bhuse nashik marathi news