esakal | खुंटेवाडीतील बैलगाडी प्रतिकृती सातासमुद्रापार! ओमान, झांबियासह मलेशियातून ऑर्डर 
sakal

बोलून बातमी शोधा

khuntewadi bailgadi.jpg

गाव-खेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यातील बहुतांश कलात्मक बैलगाड्या खुंटेवाडी (ता. देवळा) येथील विजय जाधव यांनी बनविल्या असून, आता त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे.

खुंटेवाडीतील बैलगाडी प्रतिकृती सातासमुद्रापार! ओमान, झांबियासह मलेशियातून ऑर्डर 

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : गाव-खेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यातील बहुतांश कलात्मक बैलगाड्या खुंटेवाडी (ता. देवळा) येथील विजय जाधव यांनी बनविल्या असून, आता त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या विजयचे कौतुक होत आहे. 

खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार
शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधीकाळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे. परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले, तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहेत. जाधव तयार करत असलेल्या बैलगाडीची प्रतिकृती इतकी लोभस व आकर्षक आहे की प्रत्येक जण तिच्या मोहात पडतो. यामुळेच या बैलगाड्यांना देशांतर्गत तर मागणी आहेच पण आता परदेशातूनही मागणी होऊ लागल्याने ती ग्लोबल झाली आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

परदेशासह या आकर्षक बैलगाड्यांना देशातूनही मागणी

विजय यांनी तयार केलेल्या बैलगाड्या ओमान, झांबिया या देशांत पाठविल्या असून, मलेशिया व इतर काही देशांतून बैलगाडी पाठवा, असे मेसेज श्री. जाधव यांना येत आहेत. परदेशासह या आकर्षक बैलगाड्यांना बेळगाव, गुलबर्गा (कर्नाटक), तमिळनाडू, केरळ, पंजाब, छत्तीसगड यांच्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, बुलडाणा, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदी ठिकाणांहून मागणी असून, आतापर्यंत या ठिकाणी पाच हजारांपेक्षा जास्त नग पोच झाले आहेत. यूट्यूब चॅनल, फेसबुक, व्हॉट्सॲप यावरून या कलाकृतीची जाहिरात केली जाते. ओमानमधून मोठी ऑर्डर मिळणार असल्याने कामाला गती दिली जात आहे. या कामात त्यांना पत्नी वंदना, मुलगा प्रणव यांचे सहकार्य असते. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

अशी आहे बैलगाडी 
सागवानी लाकूड, उत्कृष्ट क्वालिटीचे एमडीएफ प्लाय, फायबरचे बैल व शेतकरी कुटुंब, पितळेची चाकांची धाव व घुंगरू यातून ही बैलगाडी साकारली जाते. सूक्ष्म कोरीवकाम, रंगरंगोटी, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध व कुंदन नक्षीकाम असल्याने ही कलाकृती प्रत्येकालाच भावते. लहानमोठ्या तीन-चार आकारांत बैलगाडी बनविली जात असली, तरी २० इंच लांब, १० इंच रुंद व आठ इंच उंची असलेल्या मध्यम आकाराच्या बैलगाडीला सर्वाधिक मागणी आहे. पूर्ण संचाची किंमत पाच हजार रुपये असली तरी परदेशात पाठविताना ५५० रुपये प्रतिकिलो खर्च वाढतो. तोफ ठेवलेली बैलगाडी, घोडा, चिमण्यांची घरटी, शैक्षणिक साहित्य व इतर विविधांगी लाकडी साहित्य ते बनवितात. 

आपल्या संस्कृतीचा अभिमान
हे उत्पादन आपल्या देशातील कलात्मक आणि शेतीचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करते. सजावटीच्या उद्देशाने ही हस्तकला घरात, कार्यालयात ठेवण्यासाठी तसेच संस्मरणीय भेट देण्यासाठी या बैलगाडीला परदेशातूनही मागणी वाढल्याने आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. -विजय जाधव, संचालक, विजय क्रिएशन्स, खुंटेवाडी 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

मैंने जब युट्यूब पर विजय की बैलगाडी का मॉडेल देखा तो उनका परफेक्ट काम मोहित कर गया. यह ट्रॅडिशनल वस्तू मुझे बहुत पसंद आई। -प्रमोद नायर, ओमान (मस्कत) 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

खुंटेवाडीची बैलगाडी परदेशात जाऊ लागल्याने आमच्या गावाची ओळख वाढू लागली आहे. विजय जाधवांच्या कलाकारीचा आम्हाला अभिमान आहे. -भाऊसाहेब पगार, उपसरपंच, खुंटेवाडी, ता. देवळा