मध्यरात्रीची वेळ...महिला उपजिल्हाधिका-यांना जबरदस्तीने गाडीत बसविले...अन् शहरात प्रचंड खळबळ

woman molest by taxi diver.jpg
woman molest by taxi diver.jpg

नाशिक : मध्यरात्री भोजन झाल्यावर महिला उपजिल्हाधिकारी घराखाली आल्या होत्या. त्या इमारतीच्या खाली उभ्या असतानांच, योगशिक्षक वाहन घेऊन तेथे आले. त्याने त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. अन् मग जे काही घडले त्याने शहरात प्रचंड खळबळ माजली होती.

असे घडले सारे...

याविषयीची माहिती अशी, की  संबंधीत महिला अधिकारी नाशिकच्या आडगाव परिसरात राहतात. गुरुवारी मध्यरात्री भोजन झाल्यावर चालण्यासाठी घराच्या खाली उतरल्या होत्या. त्या इमारतीच्या खाली उभ्या असतानांच, योगशिक्षक शिवराज पाटील वाहन घेऊन तेथे आले. त्याने त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडी घेऊन ते शहराच्या दिशेने निघून गेले. हे अधिका-याच्या पतीला समजल्यावर त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी अधिका-यांना संबंधीत वाहनाचे वर्णन व घटनेची माहिती दिली.अन् पुढे....

...संबंधीत वाहनचालक घाबरला
अपहरण झालेल्या महिला महसूल विभागातील अधिकारी असल्याने पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घेतला. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिसांनी शोध घेतला असता संबंधीत वाहन मुंबई नाका परिसरातून जात होते. मुंबई आग्रा रोडवर त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्याने संबंधीत वाहनचालक घाबरला. घाबरलेल्या वाहनचालकाने गाडी वेगळ्या रस्त्यावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाठलाग थांबत नाही हे समजल्यावर वाहनचालक आणखी घाबरला. त्याचा फायदा घेऊन या महिलेने वडाळा रस्त्यावर गाडीतून उतरुन घेतले. अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक पसार झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगशिक्षक फरार... शहरात खळबळ​ 

मात्र संबंधीत योगशिक्षक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. योगशिक्षकांने मध्यरात्री या महिला अधिकारी असल्याचे माहित असतांना त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्याचे धाडस कसे केले? तो पुढे कुठे फरार झाला या माहिती विषयी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र त्यांचाही या प्रकरणात नेमकी माहिती मिळत नसल्याने गोंधळ असल्याचे अधिका-यांनी खाजगीत सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संबंधीत महिला अधिका-याशी संपर्क करण्याचा प्रयत्न  केला असता, त्यांचा दुरध्वनी बंद होता. 

माहितीविषयी पोलिसांचाही गोंधळ

जिल्ह्यातील एका महिला उपजिल्हाधिका-याचे गुरुवारी मध्यरात्री अपहरण झाले. यासंदर्भात त्यांनी शहरातील आडगाव पोलिस ठाण्यात योगशिक्षक शिवराज पाटील यांच्या विरोधात तक्रार केली आहे. याबाबत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.यासंदर्भात आडगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.  मात्र या प्रकरणातील माहितीविषयी पोलिसांचाही गोंधळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com