'किसान रेल्वे' ठरतेय लाभदायक! आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन मालाची वाहतूक

Indian-Railway.jpg
Indian-Railway.jpg

नाशिकरोड : फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वेने शेतमालाच्या विक्रीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेने चांगला प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेने देशात सर्वप्रथम देवळाली ते मुझफ्फरपूर ही किसान रेल्वे सुरू करून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता ही गाडी आठवड्यातून तीन वेळेस धावू लागली आहे. तसेच नागपूर ते आदर्शनगर, दिल्ली (साप्ताहिक), सांगोला ते मनमाड (त्रि-साप्ताहिक) आणि सांगोला ते सिकंदराबाद (साप्ताहिक) या आणखी किसान रेल्वे सुरू केल्या आहेत. बर्फात ठेवलेले मासे, डाळिंब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, भाजीपाला व नाशवंत वस्तूंची किसान रेल्वे वाहतूक करत आहे.  

७ महिन्यांत सुमारे १३,४०० मालवाहतूक गाड्या

मागील ७ महिन्यांत मध्य रेल्वेने सुमारे १३,४०० मालवाहतूक गाड्या चालवल्या. दररोज सरासरी २,७७६ वॅगनप्रमाणे एकूण ६.४४ लाख वॅगन्समधून विविध वस्तूंची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने २.५० लाख वॅगन्समधून कोळसा, १.९५ लाख वॅगन्समधून कंटेनर्स, ४२,९८५ वॅगन्समधून सिमेंट, ५,१२७ वॅगन्समधून अन्नधान्य, ३०,२२२ वॅगन्समधून खते, ६०,५४१ वॅगन्समधून पेट्रोल, तेल व वंगण, १६,९७३ वॅगन्समधून पोलाद, ३३०३ वॅगन्समधून साखर, ७,८०५ वॅगन्समधून कांदा, २,३२७ वॅगन्समधून कडबा तर संकीर्ण मालाची २८,७२७ वॅगन्समधून वाहतूक केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com