सातबाराच्या उताऱ्यावर नाव लावण्यास मागितली लाच; मनमाडच्या कोतवालास पडली महागात

bribe 123.jpg
bribe 123.jpg

मनमाड (जि.नाशिक) : सातबाराच्या उताऱ्यावर नाव लावण्यास मदत करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल राजू पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मनमाडच्या कोतवालास दीड हजारांची लाच घेताना अटक

तक्रारदाराने प्लॉट खरेदी केल्यानंतर त्यांना सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यास मदत करण्यासाठी पाटील याने दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार या पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता, कोतवाल पाटीलला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com