PHOTO : लग्नसोहळ्यावर उधळपट्टी करणाऱ्यांनो...हे बघाच.... 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

कुटे दांपत्याची कन्या रंगोली आणि यश हरीशभाई हेमनानी यांचा छोटेखानी लग्नसोहळा निवासस्थानी नुकताच झाला. खरे म्हणजे, लग्नसोहळा धूमधडाक्‍यात करायचा नाही, असा संकल्प कुटे परिवाराने केला होता.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आरक्षण मोर्चात अग्रभागी असलेले हॉटेल एस.एस.के. सॉलिटेअरचे संचालक शैलेश कुटे यांनी समाजाने लग्नसोहळ्यातील उधळपट्टी थांबवायला हवी, अशी भूमिका मांडली होती. त्याची सुरवात श्री. कुटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री यांनी कुटुंबापासून करत आदर्श ठेवला. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

असा ठेवला कुटेंनी आदर्श.....
कुटे दांपत्याची कन्या रंगोली आणि यश हरीशभाई हेमनानी यांचा छोटेखानी लग्नसोहळा निवासस्थानी नुकताच झाला. खरे म्हणजे, लग्नसोहळा धूमधडाक्‍यात करायचा नाही, असा संकल्प कुटे परिवाराने केला होता. त्यास हेमनानी परिवाराने अनुकूलता दर्शविली. रंगोली आणि यशच्या लग्नसोहळ्याच्या निमंत्रणपत्रिका छापल्या नाहीत. मानपान नाही. भोजनावळी, डामडौलाला फाटा देण्यात आला. वधू-वरांकडे मोजके पाहुणे, आप्तेष्ट सोहळ्यासाठी उपस्थित होते. साधेपणाच्या सोहळ्यासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अमरीशभाई पटेल, मुझ्झफर हुसेन, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, ज्येष्ठ पोलिस अधिकारी डॉ. कुलवंतकुमार सरंगल, प्रवीण पडवळ, प्रवीण दराडे आदींनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. 

हेही वाचा > मुख्याध्यापकानेच केले 'असे' लाजीरवाणे कृत्य...की गेला थेट जेलमध्येच!

हेही वाचा >  रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kute Couple avoid extravagance of marraige Nashik Marathi News