PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 17 February 2020

संशयित रामेश्‍वर भागवत याच्याशी गेल्या महिन्यात पीडितेने मंदिरात दुसरे लग्न केले होते. मात्र दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या या लग्नास विरोध होता. त्यामुळे ते दोघेही वेगळेच राहत होते. तर तिला त्याच्या घरी घेऊन जावे, असा तिचा आग्रह होता. त्यावरूनच दोघांमध्ये शनिवारी सकाळपासून वाद सुरू होते. दुपारी संशयित रामेश्‍वरने तिला भेटण्यास बसस्थानक परिसरात बोलविले. त्यानंतर....

नाशिक/लासलगाव : लासलगाव बसस्थानक परिसरात शनिवारी (ता. 15) महिलेच्या जळीत प्रकरणातील मुख्य संशयिताला रविवारी (ता. 16) दुपारी ग्रामीण पोलिसांनी येवल्यातून अटक केली आहे. दरम्यान, उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जळीत महिलेस मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिसांत मुख्य संशयितासह पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक व कामगार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनेनंतर मुख्य आरोपीसोबतचे दोन्ही मित्र दत्तू जाधव आणि नीलेश केंदळे यांना केवळ संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
या घटनेतील मुख्य संशयित रामेश्‍वर मधुकर भागवत याला ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता. 16) अटक केली. प्राथमिक चौकशीतून त्याने घडलेला प्रकार सांगितला. सोमवारी (ता. 17) त्यास निफाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

जळीत पीडिता उपचारासाठी मुंबईत ​

घटनेत गंभीररीत्या 67 टक्‍के भाजलेल्या महिलेस रविवारी (ता. 16) पहाटे तीनच्या सुमारास मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. भायखळ्यानजीक असलेले मसिना हॉस्पिटल जळीत रुग्णांवर उपचार करणारे राज्यातीलच नव्हे, तर देशातील नावलौकिक असलेले हॉस्पिटल आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पीडितेची विचारपूस केली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तिला पुढील उपचारासाठी भायखळा येथील मसिना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

असा घडला प्रकार... पीडितेने दिला जबाब 
संशयित रामेश्‍वर भागवत याच्याशी गेल्या महिन्यात पीडितेने मंदिरात दुसरे लग्न केले होते. मात्र दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या या लग्नास विरोध होता. त्यामुळे ते दोघेही वेगळेच राहत होते. तर तिला त्याच्या घरी घेऊन जावे, असा तिचा आग्रह होता. त्यावरूनच दोघांमध्ये शनिवारी सकाळपासून वाद सुरू होते. दुपारी संशयित रामेश्‍वरने तिला भेटण्यास बसस्थानक परिसरात बोलविले. त्यानुसार ती तिच्या मोपेडवरून गेली. जाताना तिने गुंजाळ पेट्रोलपंपावरून बाटलीमध्ये पेट्रोल घेतले होते. बसस्थानक परिसरात त्यांची भेट झाली असता, तेथेही त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे पीडिता तिच्या मोपेडकडे आली. तिने डिकीतून पेट्रोलची बाटली काढली आणि टाकीत ते ओतायचे होते. त्याच वेळी संशयित रामेश्‍वर त्या ठिकाणी पळत आला आणि "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली. या ओढाताणीमध्ये दोघांच्याही अंगावर पेट्रोल सांडले. त्यानंतर त्याने काडी पेटविलेली काडी ओढत असताना, तिच्या अंगावर पडली आणि त्यात महिला भाजली. आसपासच्या लोकांनी धाव घेत आग विझविली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तत्काळ प्राथमिक उपचार करून तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, असा लेखी जबाब पीडित महिलेने ग्रामीण पोलिसांना दिला आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

लासलगाव जळीत प्रकरण : पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक व कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल 
निफाडचे पोलिस निरीक्षक आर. बी. सानप, सहाय्यक निरीक्षक खंडेराव रंजवे, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलिस कर्मचारी कैलास महाजन, प्रदीप अजगे, योगेश शिंदे तपास करीत आहेत. 
 

हेही वाचा > 'सर, याच्याकडे बंदूक आहे!'...अन् शाळेत उडाली खळबळ...

संशयिताला निफाड न्यायालयात हजर केले जाणार

मुख्य संशयित रामेश्‍वर भागवत याला अटक केली आहे. पीडितेने दिलेल्या माहितीप्रमाणेच त्यानेही प्राथमिक माहिती दिली आहे. चौकशी सुरू असून, सोमवारी (ता. 17) त्याला निफाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. -डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण 

हेही वाचा > PHOTO : खेळता खेळता 'ती' थेट पोहचली अनोळखी रस्त्यावर...अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasalgaon woman burn case victim given statement Nashik Marathi Crime News