PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 14 February 2020

ती उर्वरित दोघांना घेऊन जाईल, या अंदाजाने वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्यास प्रथम मनाई केली. मात्र, सायंकाळपर्यंत ती दोघांना घेऊन जाण्यासाठी न आल्याने अखेर पिंजरा लावला होता. ऊसतोड थांबविण्यात येऊन परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.

नाशिक : सिन्नर तालुक्‍यातील सोमठाणे येथील उसाच्या शेतात बुधवारी (ता. 12) बिबट्याचे तीन ते चार दिवसांचे तीन बछडे आढळले. मादी बिबट्याने दोन बछड्यास परवाच सुरक्षित स्थळी नेले. मात्र बुधवारी रात्री साडेआठला व गुरुवारी (ता. 13) दुपारी साडेचारच्या सुमारास उर्वरित एका बछड्याला मादी घेऊन गेल्याचे वनपाल अनिल साळवे यांनी सांगितले. 

Image may contain: 1 person, outdoor

मादी बिबट्या दिसल्याने ऊसतोड कामगारांची भंबेरी

दोन बछडे बुधवारी रात्री उसाच्या शेतात होते. मादी व बछड्यांची भेट घडविण्यासाठी वन विभागाकडून सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. सोमठाणे शिवारातील उत्तम पदाडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असून, बुधवारी सकाळी कामगार ऊसतोड करीत असताना, त्यांना सुमारे तीन ते चार दिवसांचे बिबट्याचे तीन बछडे आढळले. या वेळी बछड्यांच्या काही अंतरावर मादी बिबट्या दिसल्याने ऊसतोड कामगारांची भंबेरी उडाली. बछड्यांच्या शोधात आलेली मादी एका बछड्यास उचलून सुरक्षित जागी घेऊन गेली. घाबरलेल्या ऊसतोड कामगारांनी परिसरातील वस्तीकडे धाव घेत घटनेची माहिती शेतकऱ्यांना दिली. याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल साळवे, वनरक्षक शरद थोरात, वनमजूर मधुकर शिंदे आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मादी बिबट्या उर्वरित दोन बछड्यांना घेऊन जाईल, या अंदाजाने वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्यास प्रथम मनाई केली. मात्र, सायंकाळपर्यंत मादी बछड्यांना घेऊन जाण्यासाठी न आल्याने अखेर पिंजरा लावला होता. ऊसतोड थांबविण्यात येऊन परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. घटनास्थळावर 360 डिग्री कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मादी व बछड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. ईको एनजीओचे स्वयंसेवक कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून असून, मादी व बछड्यांची भेट घडविण्यासाठी प्रयत्न रात्रीपर्यंत सुरू होते. गुरुवारी दोन्ही बछडे मादीने नेल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. 

No photo description available.

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

तीन दिवसांतील दुसरी घटना 
सिन्नर तालुक्‍यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बिबट्याचे बछडे दिसण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. रविवारी (ता. 9) चोंढी परिसरात सुमारे एक महिन्याचा बिबट्याचा बछडा दिसून आला होता. मात्र, काही वेळातच मादीने हा बछडा सुरक्षित ठिकाणी नेला होता. बिबट्याच्या संचाराने नागरिकांतील भीती अद्यापही कायम आहे.  

हेही वाचा > आठवी उत्तीर्ण अयानला "अभियांत्रिकी'तही गती ..विद्यार्थ्यांसाठी ठरतोय हक्काचा हेल्पिंग हॅंड! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard baby found in the field Nashik Marathi News