विहीतगावमध्ये भरवस्तीत बिबट्याचे दर्शन! वन विभागाची शोधमोहिम सुरु; सीसीटिव्ही VIDEO मध्ये कैद

leopard 123.jpg
leopard 123.jpg

नाशिक रोड : विहीतगावमध्ये सकाळी भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थामध्ये भितींचे वातावरण परसले असून बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहिम सुरु आहे. बिबट्या एका झाडाच्या झुडपात लपून बसला आहेत अशी माहिती तिथल्या ग्रामस्थांनी दिली. 

पत्र्याचा शेडमध्ये महिला सफाई कर्मचारीला दिसला
याबाबत ग्रामस्थानी सांगितले की, सकाळी राणी लक्ष्मीबाई रोड जहागिरदार वाडा मंदिराच्या पत्र्याचा शेडमध्ये बिबट्या महिला सफाई कर्मचारीला दिसला. त्यानंतर तिने आरडा ओरड केल्यानंतर तो तेथून निघुन मारुती मंदिराच्या मागील बाजुस गुलाब शेख यांच्या बाथरुम (मोरी )मध्ये जावून लपला. तेथे पोलीसांनी काठीच्या साहाय्याने बाहेर काढत असताना तो बाथरुंमची लोखंडी जाळी तोडून बाहेर पडला. एका घरावरुन मोठी झेप घेत तो विहीतगाव स्मशानभुमि शेजारी नदी कडेला झाडाझुडपात गेला. बिबट्याला बाहेर काढत असतांना धावपळीत पोलीस जखमी झाले. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथक येवून त्यांनी परिसराची पाहणी करुन शोध सुरु केला.

बिबट्या येऊन बाथरुममध्ये शिरला

बिबट्यांची माहिती परिसारत मिळतांच बिबट्या पहाण्यासाठी विहीतगाव वालदेवी नदी पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. गुलाब शेख यांनी सांगितले की मी घरात दरवाज्याजवळ आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चुल पेटवित असतांना या दरम्यान घराच्या दरवाजातुन बिबट्या येऊन बाथरुम मध्ये शिरला. त्यामुळे मी फार घाबरुन गेलो बाहेर येवून इतरांना सांगितले. त्याचवेळी पोलीस आले, त्यांनी काठीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तो बाथरुमची लोखंडी जाळी तोडून बाहेर पडला. 

बिबट्या धुम ठोकून पळाला

प्रमोद कोठूळे यांनी सांगितले की, सकाळी मी घराच्या बाहेर पडत असतांना मारुती मंदिरकडून बिबट्या येतांना दिसला. मी त्यांला काठीच्या साह्याय्याने आडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिबट्या धुम ठोकून पळून गेला.  

 
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नकाते, उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहकले यांनी घटनास्थळी आले. नगरसेविका सत्यभामा गाडेकर, नगरेसवक जगदिश पवार, राष्ट्रवादी काॅग्रेसचे विक्रम कोठूळे आदिनीं शोध मोहिमेसाठी सहकार्य केले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com