मद्यविक्रीची दुकाने तर उघडणारच...पण अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी तळीरामांची  मात्र "आयडीयाची कल्पना"! 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 7 May 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार शुक्रवार (ता. 8)पासून विक्रीस सुरवात होणार आहे. परवानाधारक सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत मद्याची विक्री करू शकणार आहेत. पण त्या अगोदर तळीरामांनी बुधवारपासूनच आयडीयाची कल्पना लढवत अ‍ॅडव्हान्स बुकींग केल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक : कोरोना विषाणूमुळे बंद असलेली मद्यविक्री दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग बुधवारी (ता. 6) मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार शुक्रवार (ता. 8)पासून विक्रीस सुरवात होणार आहे. परवानाधारक सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत मद्याची विक्री करू शकणार आहेत. पण त्या अगोदर तळीरामांनी बुधवारपासूनच आयडीयाची कल्पना लढवत मद्य मिळेल की नाही या भितीने अगोदरच अ‍ॅडव्हान्स बुकींग केल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारपासूनच तळीरामांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिनाभर मद्याची दुकाने बंद होती. सोमवारी (ता. 4) दारूची दुकाने उघडण्यात आली होती; परंतु नियमांचे उल्लंघन आणि तळीरामांची गर्दी यामुळे विक्रेत्यांवर अवघ्या दोन तासांत दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे असा प्रकार टाळण्यासाठी एक्‍साइजने टोकन अथवा कूपनचा पर्याय निवडल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर मद्य खरेदीसाठी व्हाटस्अ‍ॅपव्दारे मागणी नोंदवावी लागेल. त्याला दुकानदार स्विकृती देईल. अशा स्विकृती मिळालेल्या ग्राहकांना ऑनलाईन टोकन क्रमांकानुसार दिलेल्या वेळेतच खरेदी करणे शक्‍य होईल. असा पर्याय निवडण्यात आला होता. पण यातही गंमत म्हणजे दुकाने शुक्रवारी सुरु होणारच आहेत. मात्र लक्षावधींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही बुधवारी (ता.६) रात्रीच झाल्याची माहिती मिळत आहे.  

सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार

मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशात मालेगाव महापालिका, शहरातील कंटेन्मेंट झोन, तसेच महापालिका, नगर परिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल आणि बाजारातील मद्यविक्रीची दुकाने वगळून उर्वरित भागातील दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रेत्यास यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. या सूचनाचे पालन होईल, असे हमीपत्रदेखील देणे बंधनकारक असणार आहे. यांसह शासनाने घालून दिलेल्या नियामांचा फलक हा दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशदेखील या वेळी देण्यात आलेले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

शुक्रवारपासून ठराविक वेळेत विक्री; कंटेन्मेंट झोनमध्ये बंदी 

मुंबई, पुणे शहरात प्रतिष्ठीत संस्था, प्रकल्प आपली उत्पादने निमंत्रण दिलेल्या ग्राहकांशिवाय इतरांना विक्री करत नाही. त्याला बुकींग ऑन इनव्हीटेशन अर्थात निमंत्रणावर विक्री अशा शब्दप्रयोग केला जातो. नाशिकमध्ये त्याची तंतोतंत स्विकार झाला आहे. मद्यविक्रीसाठी. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने शहरात सलग बेचाळीस दिवस दारुची दुकाने, हॉटेल्स, बार बंद होती. त्यामुळे सोमवारी कंटोनमेंट झोन बाहेरील मोजकी दुकाने सुरु झाली, तेव्हा खेरदीसाठी झुंबड उडाली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे चार तासांतच पोलिसांनी दुकाने बंद केली. आता ही दुकाने उद्या (ता.८) पुन्हा सुरु होणार आहेत. 

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

मद्यविक्रीस असलेल्या सूचना 
- दुकानासमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये. 
- प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे. त्यासाठी सहा फुटांवर वर्तुळ आखावेत. 
- खरेदीकरिता येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. 
- दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावा. मास्क, हॅन्डग्लोजचा वापर करावा. 
- ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याकरिता सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquor stores will be opened but drunker idea for advance booking nashik marathi news