photos : लॉकडाऊनमध्ये 'या' चिमुकल्या सुगरणीची होतेय सोशल मीडियावर खमंग चर्चा!...अनेकांना हवेय स्वयंपाकाचे धडे

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

(गणुर) लॉकडाऊनची शिट्टी वाजली अन् २१ दिवस 'काय?'चं उत्तर शोधतांना अनेक पुरुषांनी किचनचा ताबा घेतला, मग काय काहींच्या चपात्या म्हणजे जगाचा नकाशा तर तव्याला चिपकलेलं, करपलेल्या थालीपीठपर्यंत सोशल मीडियात बरंच काही व्हायरल झालं. हा उत्साह जेमतेम दोन दिवस 'उकळला' पण परिपुर्णतेच्या बाबतीत 'कच्चा'चं शिजला. अशात चांदवडच्या अवघ्या तीन वर्षांच्या ईश्वरीच्या स्वयंपाकाचा खमंग मात्र सध्या सोशल मीडियात सर्वत्र दरवळतोय. अनेकांनी तर तिच्याकडून स्वयंपाकाचे धडे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

नाशिक : (गणुर) लॉकडाऊनची शिट्टी वाजली अन् २१ दिवस 'काय?'चं उत्तर शोधतांना अनेक पुरुषांनी किचनचा ताबा घेतला, मग काय काहींच्या चपात्या म्हणजे जगाचा नकाशा तर तव्याला चिपकलेलं, करपलेल्या थालीपीठपर्यंत सोशल मीडियात बरंच काही व्हायरल झालं. हा उत्साह जेमतेम दोन दिवस 'उकळला' पण परिपुर्णतेच्या बाबतीत 'कच्चा'चं शिजला. अशात चांदवडच्या अवघ्या तीन वर्षांच्या ईश्वरीच्या स्वयंपाकाचा खमंग मात्र सध्या सोशल मीडियात सर्वत्र दरवळतोय. अनेकांनी तर तिच्याकडून स्वयंपाकाचे धडे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

खेळण्या बागडण्याच्या वयात तिने मला पण स्वयंपाक शिकायचा म्हणून केला आग्रह...

वैभव गांगुर्डे ह्या हॉटेल व्यावसायिकाची मुलगी ईश्वरी... वैभव स्वतः मालक असले तरी नोकरीसाठी नव्हे तर आवड म्हणून हॉटेल मॅनेजमेंट केल्याने घर असो की हॉटेल हमखास किचनमध्ये दिसायचे. खेळण्या बागडण्याच्या वयात तिने मला पण स्वयंपाक शिकायचा म्हणून केलेला आग्रह "पुढच्या वेळी" असं आश्वासन देऊन त्यांनी दुर्लक्षित केला खरा पण एका शब्दात ऐकतील ती लेकरं कसली. पुन्हा हट्ट सुरू झाल्याने मॅगी बनवण्याचं ठरलं अर्थातच धारदार चाकूने चिरण्याचं अन गॅसचं काम आई रुपाली यांनी संभाळलं अन मॅगी तयार झाली. 

स्वयंपाक कौशल्य म्हणजे पोटाकडून ह्रदयाकडे जाण्याचा सुरेख मार्ग...

उत्तम स्वयंपाक कौशल्य म्हणजे पोटाकडून ह्रदयाकडे जाण्याचा सुरेख मार्ग असला तरी शिक्षण अन् नोकरी संभाळताना प्रत्येकीला तो लीलया पार पाडता येत नाही. यात विविध पदार्थांचं योग्य मिश्रण जमलं की चवीची हमी निश्चित समजली जाते हेच काम ईश्वरी इतक्या लहान वयात व्यवस्थित पार पाडत असल्याचं बघून गॅस सारख्या ज्वालाग्राही वस्तुंचा कमीत कमी वापर करण्याच्या रेसिपीज वैभव यांनी ईश्वरीला शिकवल्या. ज्यात एक गोष्ट वारंवार सांगावी लागत असली तरी तिची शिकण्याची धडपड वडिलांना कायम उत्साह देणारी ठरली. यातून मॅगी, ऑम्लेट, व्हेज पिझ्झा, बिस्कीट केक, कोल्ड कॉफी, आईस लेमन टी, ओरिओ मिल्क शेक, साऊथ कोरियन स्पेशल डालगोना कॉफी, सिंगापूर स्पेशल मायलो डायनोसोर, मलई ब्रेड रोल, चिज गार्लिक ब्रेड या ग्रामीण भागात नव्याने ऐकल्या जाणाऱ्या रेसिपी ईश्वरीने बनवल्या.

Image may contain: 1 person, standing, food and indoor

हेही वाचा > अहो काय सांगता, स्पर्श न होता उघडणार दार?...'या' विद्यार्थ्यांनी लढविली अनोखी शक्कल

Image may contain: 1 person, sitting and food

लॉकडाऊनचा सदुपयोग कसा करायचा हे ईश्वरीने आपल्या कृतीतून दाखविले...

प्रथमदर्शनी इतक्या लहान वयात हे कसं शक्य आहे, असं म्हणून आपल्याला अतिशयोक्ती वाटत असले तरी याबाबतचे सर्व व्हिडिओ वैभव यांनी युट्युबला अपलोड करून सोशल मिडियात व्हायरल केल्याने अवघ्या तीन वर्षांच्या या सुगरणीची सध्या शहरात खमंग चर्चा आहे. त्यामुळे लॉकडाऊन वर 'हास्य तडका' देणारे विनोद ऐकून झाले असतील तर लॉकडाऊनचा सदुपयोग कसा करायचा हे ईश्वरीने आपल्या कृतीतून अनेकांना दाखवून दिलं आहे. 

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In lockdown chandwad's 3 years of girl learned twelve recipes nashik marathi news