PHOTOS : 'लॉकडाऊन'मध्ये महिला शेतकरी बनली लखपती...लढवली अनोखी शक्कल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

ईच्छा असते तिथे मार्ग हा नक्कीच निघत असतो. ह्याच म्हणी तंतोतंत जुळणारा प्रसंग घडला आहे. नांदूरमध्यमेश्‍वर येथील आदर्श महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त महिलेने "लॉकडाउन'च्या काळात सर्व व्यवसाय ठप्प असतानाही आपल्या बांधावरच सेंद्रीय कलिंगडची स्टॉल लावून विक्री करत त्यातून तब्बल दोन लाख रूपये कमविले आहे. 

नाशिक : (नांदूरमध्यमेश्‍वर) ईच्छा असते तिथे मार्ग हा नक्कीच निघत असतो. ह्याच म्हणी तंतोतंत जुळणारा प्रसंग घडला आहे. नांदूरमध्यमेश्‍वर येथील आदर्श महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त महिलेने "लॉकडाउन'च्या काळात सर्व व्यवसाय ठप्प असतानाही आपल्या बांधावरच सेंद्रीय कलिंगडची स्टॉल लावून विक्री करत त्यातून तब्बल दोन लाख रूपये कमविले आहे. 

मेहनतीने पिकवले पीक

नांदूर मध्यमेश्‍वर येथील शिंदे कुटुंबीयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत सेंद्रिय शेती फुलवत आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सीमा शिंदे आणि रामदास शिंदे यांनी एक एकर शेतीत "शुगर क्वीन' जातीच्या कलिंगडची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. कलिंगड लागवड करतांना शेताची नांगरणी करुन रोटाव्हेटर मारुन शेणखत व बेसल डोस देऊन मल्चिंगपेपर अंथरुन सव्वा फूट अंतरावर बीजारोपण केले. पाण्याकरीता ठिबक संचचा वापर करुन सेंद्रिय व जैविक खताचा वापर केला. 70 दिवसांत कलिंगड तयार होऊन त्यातून तब्बल तीस टन माल तयार झाला. एकरात मोठ्या आकारातील 26 टन व लहान आकारातील चार टन माल तयार झाला. त्यासाठी त्यांना एकरी साठ हजार रुपये खर्च आला. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना विक्रीस अडचण येत असल्याने अखेर त्यांनी बांधावरच स्टॉल लावून कलिंगड विक्रीचा निर्णय घेतला. 

No photo description available.

एक कलिंगड तब्बल सात किलो वजनाचे

यात आठ टन कलिंगड त्यांनी दहा रूपये किलोने विकले. त्याचे ऐंशी हजार रूपये आले तर अठरा टन माल बांधावर सहा रूपये किलोने व्यापाऱ्यास विक्री केला त्याचे एक लाख आठ हजार रूपये त्यांना मिळाले. चार टन लहान आकारातील कलिंगड साडेतीन रूपये किलोने विकत त्याचे चौदा हजार रुपये असे दोन लाख रूपये कमविले. सेंद्रिय पद्धतीने तयार कलिंगडला परिसरातून चांगली मागणी मिळाली, यात एक कलिंगड तब्बल सात किलो वजनाचे होते. 

Image may contain: plant, outdoor and food

Image may contain: food

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

Image may contain: food and outdoor

रासायनिक खतांच्या वापराने मानवाला अनेक व्याधी जडल्या आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांची लागवड करून विषमुक्त उत्पादन घेतले, तर विविध आजारांपासून सुटका मिळेल. - सीमा शिंदे, नांदूरमध्यमेश्‍वर 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the lockdown, a woman farmer became a millionaire nashik marathi news