VIDEO : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समृद्धी बोगदा पाहिला का?

विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे) जिल्ह्यांना जोडण्यासाठी "सह्याद्री' डोंगराच्या पोटात बोगदा खोदून हा रस्ता तयार होत आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी हे काम सुरू असून, यातील 735 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षअखेरीस हे काम पूर्ण होऊन बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्वांत मोठा बोगदा नाशिकला होत आहे. 

नाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे) जिल्ह्यांना जोडण्यासाठी "सह्याद्री' डोंगराच्या पोटात बोगदा खोदून हा रस्ता तयार होत आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी हे काम सुरू असून, यातील 735 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षअखेरीस हे काम पूर्ण होऊन बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्वांत मोठा बोगदा नाशिकला होत आहे. 

Image may contain: outdoor

नाशिक-ठाणे जिल्ह्याला जोडणारा 7.78 किलोमीटर बोगदा अंतिम टप्प्यात 
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग मावळत्या युती शासनाचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प होता. त्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय होत्या. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या महामार्गासाठी नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत 7.78 किलोमीटरचा बोगदा तयार होत आहे. हा बोगदा राज्यातील सर्वाधिक लांबीचा असेल. आतापर्यंत दोन्ही बाजू मिळून 735 मीटरचा बोगदा सुरुंगाचे स्फोट घडवून खोदण्यात आला आहे. ऍपकॉस कंपनी हे काम करीत असून, पिंप्री सद्रोद्दीन (इगतपुरी) ते वाशाळा (ठाणे)दरम्यान बोगद्याचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूने बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. नाशिकच्या बाजूने 411, तर वाशाळाकडून 324 मीटर लांब खोदण्यात आले. आगामी 21 महिन्यांत बोगदा खोदून पूर्ण होईल. 7.78 किलोमीटरव्यतिरिक्त 210 मीटरचा कृत्रिम शेडचा बोगदा आहे. पुढील महिन्यात दारणा नदीवर दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम सुरू होणार आहे. 

(व्हिडिओ / फोटो - केशव मते)

राज्यातील दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग

नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गाचे काम सप्टेंबर 2019 पासून सुरू झाले. आतापर्यंत 701 किलोमीटर अंतरावरील 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. त्यात एक ते सोळा असे टप्पे केले आहेत. सर्वांत अवघड, वेळखाऊ टप्पा नाशिकच्या पर्वतीय भागात आहे. नाशिक जिल्ह्यात 13 व 14 क्रमांकाचा टप्पा आहे. तेरावा 61 किलोमीटर लांबीचा टप्पा सिन्नर तालुक्‍यातून जातो. चौदावा 40 किलोमीटर लांबीचा टप्पा इगतपुरी तालुक्‍यात आहे. 

Image may contain: one or more people

दारणा नदीवर दोन किलोमीटर पूल 
घोटीजवळील दारणा धरणातील बॅकवॉटरलगत नदी व दोन डोंगरांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे. त्यासाठी कंपनीने सर्व पूर्वतयारी केली आहे. महामार्गावर 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 38 पूल आहेत. 30 मीटर रुंदीपेक्षा कमी लांबीचे 283 पूल आहेत. पाच बोगदे, आठ रेल्वेपूल असून, 54 उड्डाणपूल आणि 671 कल्व्हर्ट आहेत. या महामार्गावरील सर्वांत मोठा पूल आणि बोगदा नाशिक हद्दीत असेल. 

Image may contain: outdoor
नागपूर-सिन्नर वर्षअखेरपर्यंत 
बोगदा खोदाई सुरू असताना नागपूरपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. साधारण डिसेंबर 2021 पर्यंत नागपूर ते सिन्नर महामार्गाचे काम पूर्ण होणार असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. 

हेही वाचा >  राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही - आठवले
असा आहे समृद्धी बोगदा 
-उंची 9.12 मीटर, रुंदी 17.61 मीटर 
-300 मीटरवर 26 क्रॉस पॅकेज 
-अग्निशमन सूचनेसाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा 
-तीन मीटरचा वॉक-वे 
-700 मीटर लांबीवर ले-बाय 
-ब्रेक डाउन सिस्टिम 
-व्हेटिलेशन फॅन 
-इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम 

Image may contain: outdoor
हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

असा आहे समृद्धी महामार्ग 
-एकूण लांबी- 701 किलोमीटर 
-120 मीटर रुंदीचे सहापदरी महामार्ग 
-वाहनांची गती 120 ते 150 प्रतितास किलोमीटर 
-महामार्गावर 25 इंटरचेंजेस 
-महामार्गावर होणार 18 नवनगरे 
-दहा जिल्हे, 26 तालुक्‍यांतून मार्ग 
-प्रकल्पाची किंमत 55 हजार 335 कोटी रुपये 
-प्रकल्पासाठी भूसंपादन 8,311 हेक्‍टर 
-कालमर्यादा 36 महिने 

हेही वाचा > PHOTO : महिलांमधील रणरागिणी जिवंत झाली अन्‌ पुढे काय?  हल्लाबोल!​

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: longest samrudhhi tunnel of Maharashtra Nashik Marathi News