माझ्या प्रेयसीशी तुझे प्रेमसंबंध कसे? राग झाला अनावर.. 

love trio.jpg
love trio.jpg

नाशिक :  माझ्या प्रेयसीशी तुझे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन अशोक कौतिक वाघ (वय 35, रा. बालाजीनगर, सोयगाव) याने त्याचा मित्र समाधान जिभाऊ अहिरे (वय 33, रा. रोकडोबानगर, दाभाडी) याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रविवारी (ता. 19) दुपारी अडीचच्या सुमारास येथील जुना आग्रा रस्त्यावरील निसर्ग हॉटेलसमोर हा प्रकार घडला.

असा घडला प्रकार..

अशोक व समाधान गेल्या पंधरा वर्षांपासून घनिष्ठ मित्र आहेत. प्रेमप्रकरणाच्या संबंधावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. याप्रकरणी समाधान अहिरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अशोक याचे माया नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध असून, ते पंधरा वर्षांपासून एकत्र राहतात. मात्र अशोकला समाधानचे तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. यावरून वाद झाला. अशोकने प्रेयसी व तिच्या नातेवाइकांना निसर्ग हॉटेलजवळ चर्चेसाठी बोलावले. समाधाननेही इतर मित्रांना बोलावून घेतले. वादातून अशोकने समाधानच्या पाठीवर, पोटावर व मानेवर शस्त्राने वार केला. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा >  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

पोहाणे येथे हाणामारी 
पोहाणे (ता. मालेगाव) येथे मागील भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी अमोल अभिमन भामरे व त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना कुऱ्हाड, फावडे, रॉड व काठीने जबर मारहाण केली. 16 जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. संग्राम बोरसे, दिनेश बागूल, निखिल बागूल, नीलेश बागूल, प्रकाश बागूल, रवींद्र बागूल, शरद भामरे आदींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अमोल यांनी रविवारी (ता. 19) पोलिसांत तक्रार नोंदविली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com