"तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना..नाही सोसवत आता..!" लॉकडाऊनची प्रेमीयुगलांना मोठी झळ

long distance 2.png
long distance 2.png

नाशिक : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22 एप्रिलपासून संचारबंदी लागू झाली त्यामुळे एरवी बाहेर मुक्तपणे फिरणारे प्रेमी युगुल आता लॉकडाउन झाले आहेत. लॉकडाउनची झळ प्रेमी युगुलांनादेखील बसली आहे. शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, कॉफीशॉप, बगीचे, मॉल्स, पर्यटन स्थळे इत्यादी प्रेमी युगुलांचे भेटण्याची ठिकाणे मात्र संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्वच बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकमेकांच्या चेहरे पाहिल्याशिवाय दिवस न जाणाऱ्या मंडळींची कोरोनामुळे भारी पंचाईत झाली आहे.

एकदाचा कोरोना संपेल, लॉकडाऊन उठेल..नाही सोसवत आता

भेटीगाठी बंद झाल्याने प्रेमी युगुलांचा संवाद चोरी- चोरी चुपके - चुपके फोनवरून सुरू आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी युगुलांकडून सोशल मीडियाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. एकमेकांना पाहण्यासाठी व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संवादासाठी, व्हॉटसअँप, फेसबुक, हाईक, गूगल डिओचा वापर करण्यात येत आहे. महाविद्यालये, बगीचा, मॉल्स, कॉफी शॉप, हॉटेल्समध्ये, पर्यटनस्थळे येथे बसून एकमेकांसोबत तासनतास गप्पा मारणारी मंडळी आता घरात अडकल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी देखील लॉकडाऊन झाल्या आहेत.

प्रेमी युगल लॉकडाऊनमुळे त्रस्त; भेटीगाठी सध्या व्हिडीओ कॉलवर.

कोरोनामुळे प्रेमी युगुलांना "एक दुजे के लिए" या हिंदी चित्रपटातील तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना...या गाण्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. अशी परिस्थिती' सध्याच्या लॉकडाऊनमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एकदाचा कोरोना संपेल, लॉकडाऊन उठेल आणि पुन्हा एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटू अशी अवस्था प्रेमी युगुले व नववधू- वरांची झाली आहे. तसेच काही ना काही कारणासाठी माहेरी, बाहेरगावी गेलेल्यांची देखील पंचाईत झाली आहे. पती एका गावी आणि पत्नी एका गावी अशी काहींची अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनामुळे पती पत्नी वेगवेगळ्या शहरात लॉकडाउन झाले आहेत. तसेच प्रेमी युगुलांप्रमाणेच लग्न ठरलेल्या नव वधू- वरांची तर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरण्याआधी काही मंडळींची लग्नासाठी एकमेकांची पसंती झाली होती. एकमेकांची पसंती करायची आणी लग्ने करायची अशी स्वप्ने रंगविणाऱ्याचा देखील कोरोनाने स्वप्नभंग केला आहे. त्यामुळे अनेकांची लग्ने रखडली आहेत. तर काहींनी परवानगी काढून सामाजिक अंतर राखत मोजक्याच नातेवाईकांच्या सानिध्यात शुभमंगल उरकल्याचे चित्र दिसून येत आहे. 

भेटी गाठी आता व्हाट्सअँप कॉलिंगवर

प्रेमीयुगुले, लग्न ठरलेले नव वधू-वर यांच्यातील भेटी गाठी आता व्हाट्सअँप कॉलिंगवर सुरू झाली आहेत. प्रेमी युगुलांना पहायचे आहे. परंतू कधी आणि कुठे भेटणार यामुळे दोघेही आपापल्या घरातूंनच सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रंदिवस संवाद साधत आहेत.

भेटीगाठी होणे देखील मुश्किल

अगदीच चार दिवसावर लग्न आलंय धुमधडाक्यात लग्न करण्याचे स्वप्न आम्ही पहात होतो. प्रेमविवाहाला ही लाजवेल असा घरच्यांच्या संमतीने होणार विवाह असल्याने साखरपुड्या नंतर आठवड्यातून तीन ते चार वेळा भेटत होतो. मात्र कोरोनामुळे भेटीगाठी होणे देखील मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉल हा एकमेव पर्याय आहे.- माया राजगुरू, नववधु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com