esakal | मालेगावात एकाकडे सापडला ‘मेड इन यूएसए’ गावठी कट्टा; पोलिसांत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

NSK20F76187[1].jpg

पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या शहीद अख्तर शकील अहमद ऊर्फ अख्तर काल्या (वय ३६, रा. फार्मसी नगरमागे, अख्तरबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (ता. ७) पहाटे अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. वाचा सविस्तर घटना

मालेगावात एकाकडे सापडला ‘मेड इन यूएसए’ गावठी कट्टा; पोलिसांत गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : येथील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या शहीद अख्तर शकील अहमद ऊर्फ अख्तर काल्या (वय ३६, रा. फार्मसी नगरमागे, अख्तरबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (ता. ७) पहाटे अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. वाचा सविस्तर घटना

गावठी कट्ट्यावर ‘मेड इन यूएसए’ असे लिहिलेले...
 
पोलिसांचे जप्ती पथक गस्त घालत असताना त्यांना अख्तर काल्या एका घराच्या अडोशाला दुचाकीवर दिसला. पोलिसांना पाहून त्याने पलायन केले. पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक हजार ५०० रुपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे व ६० हजार रुपयांची दुचाकी, असा एकूण ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. गावठी कट्ट्यावर ‘मेड इन यूएसए’ असे लिहिले आहे. हवालदार सचिन धारणकर, आंबादास डामसे, सचिन भामरे, राकेश उबाळे, राकेश जाधव आदींनी ही कारवाई केली. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अख्तर काल्याला न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला