VIDEO : महाराष्ट्र बॅंकेचे खातेदार करणार चक्क अवयवविक्री?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

महाराष्ट्र बॅक अपहार बाधीत कृती समितीचे शेखर पवार यांच्या नेतृत्वाखाली दिडशेहून अधिक खातेदारांनी नाशिकला महाराष्ट्र बॅकेच्या झोन कार्यालयासमोर अवयव विक्रीचा इशारा देणारे फलक फडकावित आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत, आंदोलकांना इदगाह मैदानावर हलविले. 

नाशिक : दाभाडीतील दिडशेवर फसलेल्या खातेदारांनी नाशिकच्या महाराष्ट्र बॅकेच्या झोनल कार्यालयासमोर किडणी, डोळे अवयव विक्रीला काढल्याचे आवाहन करीत लक्षवेधी आंदोलन केले.

Image may contain: 13 people, people sitting and outdoor

पण का करणार अवयवविक्री? 

महाराष्ट्र बॅक अपहार बाधीत कृती समितीचे शेखर पवार यांच्या नेतृत्वाखाली दिडशेहून अधिक खातेदारांनी नाशिकला महाराष्ट्र बॅकेच्या झोन कार्यालयासमोर अवयव विक्रीचा इशारा देणारे फलक फडकावित आंदोलन
केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत, आंदोलकांना इदगाह मैदानावर हलविले. महाराष्ट्र बॅकेच्या दाभाडी शाखेतर्फे बॅकेच्या व्यवसाय वाढीसाठी बॅक मित्र नेमले होते. त्यापैकी काही बॅकमित्रांनी घरोघर जाउन डेली कलेक्‍शनच्या धर्तीवर खातेदारांकडून पैसे जमा केले. ऑनलाईन पॉस मशीनद्वारे
पैसे जमा करतांनाच, बॅक मित्रांनी दोनदा बोटाचे थंब घेऊन त्याचवेळी पैसे काढण्याचे थंब घेतले. या गैरप्रकारात दाभाडीतील, दिडशेवर  शेतकरी, शेतमजूर कष्टकऱ्यांना दिड कोटीला गंडा घातला गेला.खातेदारांनी महाराष्ट्र
बॅकेकडे तक्रार केली. बॅकेच्या अंर्तगत आर्थिक व्यवहाराच्या या प्रकरणात आतापर्यत खातेदारधारकांना सुमारे ५२ लाख रुपये परत मिळाले. राहिलेले पैसे परत मिळत नसल्याने आजारपण, विवाह अडले आहे. अनेकांचे आर्थिक प्रश्न गंभीर झाल्याने अवयव विक्रीची वेळ आल्याचा खातेदार कृती समितीचे सदस्य शेखर पवार यांचा दावा आहे.त्यासाठी आज महाराष्ट्र बॅकेसमाेर आंदाेलन झाले.

नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!

दिड कोटीचा गंडा

दाभाडीसह पंचक्रोशीतील खातेदारांचे दिड कोटीच्या आसपास रक्कम थकित आहे. मात्र महाराष्ट्र बॅकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी, कष्टकरी व शेतमजूरांवर आज नाशिकला येउन आंदोलनाची वेळ आली.
-शेखर पवार (आंदोलक महाराष्ट्र बॅक दाभाडी अपहार कृती समिती)

हेही बघा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra bank account holders on strike Nashik Marathi news