photos : महाराष्ट्र दिन : 60 वा वर्धापन दिन नाशिकला साधेपणाने साजरा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

आज 1 मे 60वा महाराष्ट्र दिन यानिमित्ताने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकला शासकीय ध्वजारोहण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ध्वजारोहन झाले. तर कमीत कमी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नाशिक : आज 1 मे 60वा महाराष्ट्र दिन यानिमित्ताने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकला शासकीय ध्वजारोहण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ध्वजारोहन झाले. तर कमीत कमी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज शुक्रवार (१ मे) रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंचे पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाला हरविण्याचा संदेश देण्यात आला. पालकमंत्री यांनी नागरिकांना सुरक्षित वावर ठेवण्याचे आवाहन करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले. 

Image may contain: one or more people and outdoor

Image may contain: one or more people, tree, plant, sky, outdoor and nature

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

Image may contain: 1 person, standing, sitting and outdoor

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Image may contain: stripes

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अतुर्लीकर, तहसीलदार पंकज पवार, रचना पवार उपस्थित होते.

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Day was celebrated in Nashik in the presence of Guardian Minister Chhagan Bhujbal nashik marathi news