
येत्या मंगळवारी या तुकडीचा दिक्षांत समारंभ असून मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरु असतांनाच, बडाखाना नंतर आधिकारी निघुन गेल्यावर रंगलेल्या संगीत रजनीमुळे कोरोना प्रतिबंधाच्या नियमभंगावरुन काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र पोलिस अकादमीतील भावी फौजदार 'सैराट'! शासनाच्या नियमांची धज्जीयाVIDEO VIRAL
नाशिक : राज्याला पोलीस आधिकारी देण्याची दिर्घ परंपरा असलेल्या येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत शुक्रवारी (ता.२६) रात्री ११८ व्या तुकडीतील भावी फौजदारांनी कोरोनाचे प्रतिबंध पायदळी तुडवित केलेला
सामुहीक डान्स सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने सातशेवर फौजदारांवरील कारवाईकडे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या तुकडीचा सामूहीक नृत्य
फौजदार पदाची अधिकृत दिक्षांत सभारंभात शपथ घेण्यापूर्वी आठवडाभर आधीच कोरोनाचे प्रतिबंधाचे सोशल डिन्सन्सिंगचे नियम धाब्यावर बसवित डीजेच्या तालावर फौजदार नाचले.
विशेष म्हणजे त्याधी चार तास पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव पोलिस आधिक्षक सचिन पाटील आदीसह जिल्ह्यातील सगळी यंत्रणा कोरोनाच्या प्रतिबंधांची नाशिकला नागरिकांनी कसा फज्जा उडविला आहे. यावर चिंता वाहत होते. तर दुसरीकडे त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत मात्र भावी फौजदारांची कोरोना प्रतिबंधाचे नियम डावलण्याच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ डीजे सांस्कृतीक कार्यक्रमाची जणू तयारी सुरु होती. असा परस्पर विसंगत प्रकार नाशिकमध्ये घडत होता.
बडा खाना आणि संगीत रजनी
महाराष्ट्र पोलीस अकादमीत राज्याच्या पोलिस दलाला उपनिरीक्षक, उप अधिक्षक दर्जाचे आधिकारी पुरविले जातात. यंदाची महाराष्ट्र पोलिस अकादमीची ११८ वी तुकडी असून साधारण ७०० आधिकारी या महिण्यात तुकडीत आहेत. प्रत्येक तुकडीच्या पासींग आउट परेडपूर्वी एमपीएत बडा खानाची पार्टी असते. साधारण ३१ मार्चपूर्वी दिक्षांत सभारंभ होउन तुकडीतील प्रशिक्षणार्थी त्यांच्या कर्तव्यावर रवाना होतात. यंदाच्या तुकडीला पहिल्यापासून लॉकडाउन आणि कोरोनाचा विळख्यात असल्याने प्रचंड निर्बधांत प्रशिक्षण झाले. अशाही स्थितीत अकादमीत कोरोनाचा शिरकाव झाला होता. अशातच फेब्रुवारी ते मार्चमध्ये अडीच हजाराहून १९ हजारापर्यत कोरोनाचे रुग्ण वाढले असतांना शुक्रवारी त्यावर जिल्ह्यातील सगळी यंत्रणा मंथन करीत असतांना शहरात पन्नास लोकांना एकत्र यायला मज्जाव आहे. विवाह ५० लोकांत दशक्रिया विधी २० लोकांत होत असतांना दुसरीकडे याच तुकडीतील प्रशिक्षणार्थीचा सामूहीक डान्स व्हायरल झाला आहे.
नियमभंगावरुन काय कारवाई होणार याकडे लक्ष
येत्या मंगळवारी (ता.३०) या तुकडीचा दिक्षांत समारंभ असून मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरु असतांनाच, बडाखाना नंतर आधिकारी निघुन गेल्यावर रंगलेल्या संगीत रजनीमुळे कोरोना प्रतिबंधाच्या नियमभंगावरुन काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
Web Title: Maharashtra Police Academy Function Video Viral Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..