रब्बीमध्ये डाळी, तृणधान्य लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर!

maharashtra pulses & grains.jpg
maharashtra pulses & grains.jpg

नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेमुळे यंदा रब्बीमध्ये डाळी अन्‌ तृणधान्याच्या लागवडीमध्ये देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाचे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र 6 कोटी 44 लाख हेक्‍टर असून, आतापर्यंत त्यापेक्षा अधिक म्हणजेच, सहा कोटी 54 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. 

तृणधान्याच्या लागवड झालेल्या हेक्‍टरमध्ये महाराष्ट्रातील साडेसहा लाख हेक्‍टर क्षेत्र 

देशात डाळींची एक कोटी 59 लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. त्यात, महाराष्ट्राचा आठ लाख 26 हजार हेक्‍टरचा समावेश आहे. तसेच, तृणधान्याच्या लागवड झालेल्या 54 लाख 83 हजार हेक्‍टरमध्ये महाराष्ट्रातील साडेसहा लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. देशात गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तीन कोटी पाच लाख सर्वसाधारण क्षेत्रापैकी तीन कोटी 34 लाख हेक्‍टरवर गव्हाची पेरणी उरकली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दोन कोटी 99 लाख हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली होती. देशात गेल्या वर्षी जानेवारीअखेर पर्यंत रब्बीच्या पाच कोटी 97 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या होत्या. 

यंदा आतापर्यंत गव्हाची पेरणी झालेले क्षेत्र राज्यनिहाय 

मध्य प्रदेश- 19 लाख 68 हजार, 
गुजरात- पाच लाख 83 हजार, 
राजस्थान- चार लाख 90 हजार, 
महाराष्ट्र- चार लाख 47 हजार. 

डाळीची लागवड झालेले क्षेत्र राज्यानुसार याप्रमाणे 

राजस्थान- सहा लाख 53 हजार, 
गुजरात- दोन लाख 16 हजार, 
छत्तीसगड- एक लाख 14 हजार. 

तृणधान्याचे लागवड झालेले क्षेत्र हेक्‍टरमध्ये राज्यनिहाय  

राजस्थान- 55 हजार, आंध्र प्रदेश- 47 हजार, बिहार- 38 हजार, तेलंगणा- 38 हजार, गुजरात- 26 हजार. गव्हाची पेरणी कमी झालेल्या राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, हरियाना, पंजाब, आसामचा समावेश आहे. शिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आसाम, ओरिसा, तमिळनाडू, हरियाना, मेघालय, बिहारमध्ये डाळींची, तर कर्नाटक, तमिळनाडू, हरियाना, पंजाबमध्ये तृणधान्याची लागवड कमी झाली आहे. 

तेलबियांची कर्नाटकमध्ये सर्वाधिक लागवड

तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम, ओरिसामध्ये रब्बीमध्ये भाताची लागवड होते. 26 लाख 11 हजार हेक्‍टर लागवड झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक सव्वातीन लाख हेक्‍टर क्षेत्र तेलंगणामधील आहे. तेलबियांची 79 लाख 66 हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक 47 हजार हेक्‍टरवर तेलबियांची लागवड झाली. 
मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात तेलबियांची कमी लागवड झाली. 

देशातील रब्बी लागवडीची स्थिती (आकडे हेक्‍टरमध्ये) 

पीक सर्वसाधारण क्षेत्र आतापर्यंतची लागवड गेल्या वर्षीची लागवड 
भात 42 लाख 76 हजार 26 लाख 11 हजार 21 लाख 15 हजार 
डाळी एख कोटी 46 लाख एक कोटी 59 लाख एक कोटी 50 लाख 
तेलबिया 78 लाख 85 हजार 79 लाख 66 हजार 79 लाख 61 हजार 
तृणधान्य 60 लाख 78 हजार 54 लाख 83 हजार 47 लाख आठ हजार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com