Mahashivratri 2020 : "हर हर महादेव"च्या जयघोषांनी निनादली त्र्यंबकेश्वर नगरी!

केशव मते / अरूण मलाणी : सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता.२१) दर्शनबारी २४ तास सुरू राहणार आहे. उत्तर दरवाजाने देणगी दर्शन सकाळी सात वाजेपासून सुरू करण्यात आली होती. अर्थात गर्दी वाढल्यास देणगी दर्शन बंद करण्यात येईल. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी पश्चिम दरवाजाने दर्शन घेता येणार आहे. सकाळी मंदिर उघडल्यापासून दुपारी साडे बारावाजे पर्यंत व सायंकाळी सहा वाजेपासून रात्री पर्यंत दर्शनासाठी जाता येणार आहे.

नाशिक/ त्र्यंबकेश्वर : आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीस देवस्थान संस्थान पेशवेकालीन परंपरेने वर्षभरात बारा उत्सव साजरे करीत असते. महाशिवरात्र हा एक प्रमुख उत्सव आहे. यादिवशी येथे देशविदेशातून भाविक दर्शन पूजाअभिषेक करण्यासाठी यंदा आले आहेत.

मंदिर अहोरात्रौ भाविकांच्या दर्शनासाठी खुले

शुक्रवारी पहाटे ४ वाजता मंदिर उघडल्यानंतर त्यानंतर अहोरात्रौ भाविकांच्या दर्शनासाठी खुले असेल. त्यानंतर भगवान त्र्यंबकराजाची पालखी पाचआळीमार्गे कुशावर्त तीर्थावर व तेथून मेनरोडने त्र्यंबकेश्वर मंदिरात करण्यात येते. धर्मदर्शन हे पूर्वदरवाजा दर्शनबारीने भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. महाशिवरात्र उत्सवाचे दिवसाला त्र्यंबकेश्वर येथील पुरातन शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत असते. स्थानिक भाविक अहिल्या गोदावरी संगमाजवळ असलेल्या जुना महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असतात. शहरातील विविध शिवमंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Image may contain: 6 people, crowd and outdoor

त्र्यंबकेश्वर एक पवित्र तीर्थस्थान...
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे बांधकाम इ. स. इ.स. १७५५-१७८६ साली नानासाहेब पेशवे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर असून दर सोमवारी येथे त्र्यंबकेश्वराची पालखी मिरवली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरू फार मोठया संख्येने दर्शनासाठी येतात.

Image may contain: 1 person, smiling

व्हिआयपी दर्शन पूर्णपणे बंद

आज शुक्रवारी,(ता.२१) महाशिवरात्रीनिमित्त दर्शनबारी २४ तास सुरू राहणार आहे. उत्तर दरवाजाने देणगी दर्शन सकाळी सात वाजेपासून सुरू करण्यात आली होती. अर्थात गर्दी वाढल्यास देणगी दर्शन बंद करण्यात येईल. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी पश्चिम दरवाजाने दर्शन घेता येणार आहे. सकाळी मंदिर उघडल्यापासून दुपारी साडे बारावाजे पर्यंत व सायंकाळी सहा वाजेपासून रात्री पर्यंत दर्शनासाठी जाता येणार आहे. पुरोहितांना ठराविक वेळेत अभिषेक पावती देऊन भाविकांना सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यांना अभिषेक करण्यासाठी मंदिर प्रांगणात स्वतंत्र मंडप व्यवस्था केली आहे. व्हिआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. दुपारी चार वाजता पालखी उत्सव होणार आहे.

Image may contain: 15 people, including Sawant Ganesh Hnumant

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..

Image may contain: one or more people, people standing and outdoor

हेही वाचा >....ही बाब समजताच "शिवप्रेमी' भडकले..वातावरण चिघळले..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivratri at Trimbkeshawar Nashik Marathi News