esakal | सकाळ इम्पॅक्ट : चांदवड-देवळ्यात आजपासून आधारभूत किमतीत मका खरेदी; शेतकऱ्यांमध्ये समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Maize will be procured at base price

‘सकाळ’ बातमीचा परिणाम स्वरूप बुधवार (ता. ११)पासून चांदवड व देवळा तालुक्यांतील खरेदी-विक्री संघांच्या केंद्रावर आधारभूत किमतीत मका खरेदी सुरू होणार आहे. 

सकाळ इम्पॅक्ट : चांदवड-देवळ्यात आजपासून आधारभूत किमतीत मका खरेदी; शेतकऱ्यांमध्ये समाधान

sakal_logo
By
भाऊसाहेब गोसावी

नाशिक/चांदवड : ‘सकाळ’ बातमीचा परिणाम स्वरूप बुधवार (ता. ११)पासून चांदवड व देवळा तालुक्यांतील खरेदी-विक्री संघांच्या केंद्रावर आधारभूत किमतीत मका खरेदी सुरू होणार आहे. 

व्यापारीवर्गाकडून होणारी लूट थांबणार

मंगळवारी (ता. १०) ‘सकाळ’मध्ये आधारभूत किमतीत मका खरेदी सुरू करून मका खरेदीची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील दहा शेतकरी शासकीय दराने आधारभूत किमतीत मका खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ मका खरेदी सुरू करावी, अशी मागणी केली होती. ‘सकाळ’मधील बातमीची दखल घेत चांदवड खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब शेलार यांनी बुधवार (ता. ११)पासून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी होणार असल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली. खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर आधारभूत किमतीत मका खरेदी सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर व्यापारीवर्गाकडून होणारी लूट थांबविण्यासाठी काहीअंशी पायबंद घातला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


जिल्हा स्तरावरून हेक्टरी किती मका खरेदी करावा, असे स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. तरीही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी बुधवारपासून चांदवडला मका खरेदी सुरू केली जाईल. 
-भाऊसाहेब शेलार, अध्यक्ष खरेदी-विक्री संघ, चांदवड 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..