ऐन नववर्षातच मालेगावकरांना धक्का; संपूर्ण राज्‍यभरातून चिंता व्यक्त

death 123.jpg
death 123.jpg

नाशिक : जिल्ह्यात‍ पहिल्‍या टप्प्‍यात कोरोनाचा शिरकाव झाल्‍यानंतर बाधितांच्‍या मृत्‍यूमुळे मालेगावबाबत संपूर्ण राज्‍यभरातून चिंता व्‍यक्‍त होत होती; परंतु नंतरच्‍या काळात बाधित व मृतांचे प्रमाण घटले होते. अशात नवीन वर्षाला सुरवात होऊन १७ दिवसांनी रविवारी (ता. १७) मालेगावला एका बाधिताचा मृत्‍यू झाला. जिल्ह्यात दिवसभरात १२८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या १९० आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ६३ ने घट झाली असून, सद्यःस्थितीत जिल्ह्यात‍ एक हजार ३१५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात १२८ पॉझिटिव्ह, बरे झाले १९० रुग्ण 
मालेगाव महापालिका हद्दीतील क्षेत्रात गेल्‍या २९ डिसेंबरला कोरोनाबाधिताचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर साधारणतः १९ दिवसांनंतर रविवारी (ता. १७) कोरोनाबाधिताचा मृत्‍यू झालेला आहे. आतापर्यंत मालेगावला कोरोनामुळे १७६ रुग्णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दरम्‍यान, दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ११०, नाशिक ग्रामीणमधील १७, जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बरे झालेल्‍या रुग्णांमध्ये १३६ नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीणच्‍या ५४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. मालेगावचा मृत हा दिवसभरात जिल्ह्यातील एकमेव बळी राहिला.

दोन हजार २९ रुग्णांचा मृत्‍यू

दरम्‍यान, दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ४६८, नाशिक ग्रामीणमध्ये दहा, मालेगावला दोन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात साठ, जिल्‍हा रुग्णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७६ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. कोविडपश्‍चात बाह्यरुग्ण विभागांमध्ये ३१६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. दरम्‍यान, जिल्ह्या‍तील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १३ हजार ६८६ वर पोचला आहे. यापैकी एक लाख १० हजार ३४२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेली आहे. जिल्ह्यात‍ कोरोनामुळे दोन हजार २९ रुग्णांचा मृत्‍यू झालेला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com