esakal | कोरोनामुक्तीसाठी ‘मालेगाव पॅटर्न’ची चर्चा पुन्हा! आकडा शून्यावर आणण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon city 1.png

कोरोनापासून बचावाबाबत उपाययोजनांची माहिती दिली. त्यास जोड मिळाली ती काढ्याची. त्यातून कोरोनाबांधितांची संख्या घटण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात आला. सध्या मालेगावच्या काही भागात पुन्हा कोरोनाबाधित आढळत आहेत. परंतु तो नवीन भाग आहे. त्या भागातील बाधितांचे प्रमाणही जास्त नाही. दुसरीकडे नाशिक शहर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस नवीन विक्रम करीत आहे.

कोरोनामुक्तीसाठी ‘मालेगाव पॅटर्न’ची चर्चा पुन्हा! आकडा शून्यावर आणण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : शहरातील कोरोनाबांधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. कोरोनामुक्तीसाठी मालेगाव, वडाळागाव, जुने नाशिक येथे राबविलेल्या ‘मालेगाव पॅटर्न’ची चर्चा पुन्हा सुरू झाली असून, आरोग्य शिबिरे, जनजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. 

कोरोनामुक्तीसाठी मालेगाव पॅटर्नचे पुन्हा प्रयत्न 
मालेगाव येथील डॉक्टरांची उपचारपद्धती आणि मालेगावचा काढा यामुळे ‘मालेगाव पॅटर्न’ सर्वत्र नावारूपास आला होता. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात मालेगाव कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट झाले होते. रुग्णांना खाटा मिळणे अवघड झाले होते. त्यातच येथील डॉक्टरांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कंबर कसली. प्रत्येक रुग्णाच्या मनातील कोरोनाची भीती काढण्याचा प्रयत्न केला.

जुने नाशिक, वडाळागावात आरोग्य तपासणी शिबिरे 

कोरोनापासून बचावाबाबत उपाययोजनांची माहिती दिली. त्यास जोड मिळाली ती काढ्याची. त्यातून कोरोनाबांधितांची संख्या घटण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात आला. सध्या मालेगावच्या काही भागात पुन्हा कोरोनाबाधित आढळत आहेत. परंतु तो नवीन भाग आहे. त्या भागातील बाधितांचे प्रमाणही जास्त नाही. दुसरीकडे नाशिक शहर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस नवीन विक्रम करीत आहे. सामान्य परिस्थिती दिसत असली तरी नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ‘मालेगाव पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. 

सामाजिक संस्थांकडून तपासणी शिबिर 
काही सामाजिक संस्थांचा कल ‘मालेगाव पॅटर्न’कडे दिसत आहे. दूधबाजारमध्ये ‘मालेगाव पॅटर्न’ राबविण्यात येत आहे. सोमवार (ता.१४)पासून राहत फाउंडेशनतर्फे भारतनगरमध्ये आठवडाभरासाठी मालेगावातील डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी शिबिर भरविले आहे. त्याचप्रमाणे वडाळागावच्या काही भागातही शिबिर राबविण्याची तयारी सुरू आहे. दोन-तीन दिवसांत बडी दर्गा परिसरात पुन्हा शिबिर भरविले जाणार आहे. त्याच्या परवानगीसाठी काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) महापालिका आयुक्तांची भेट घेतली. पुन्हा ‘मालेगाव पॅटर्न’ राबवून शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.