esakal | मालेगावला पोलिसांची ऑलआउट मोहीम! पावणेआठ लाखांचा ऐवज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

police at night 1.jpg

नवरात्रोत्सव व आगामी ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने मालेगाव विभागात ऑलआउट स्कीम, कोम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची आश्रयस्थाने, हॉटेल, ढाबे, लॉज तपासणी करत पोलिसांनी तीन दिवसांच्या कारवाईत ३६ संशयितांना अटक केली.

मालेगावला पोलिसांची ऑलआउट मोहीम! पावणेआठ लाखांचा ऐवज जप्त

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : नवरात्रोत्सव व आगामी ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने मालेगाव विभागात ऑलआउट स्कीम, कोम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची आश्रयस्थाने, हॉटेल, ढाबे, लॉज तपासणी करत पोलिसांनी तीन दिवसांच्या कारवाईत ३६ संशयितांना अटक केली. कारवाईत एक गावठी पिस्तूल, तीन तलवारी, एक सुरा, पाच जनावरे, पिक-अप गाडी, १४ मोबाईल, सात दुचाकी व रोख रक्कम असा सुमारे सात लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी बुधवारी (ता. २१) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

पावणेआठ लाखांचा ऐवज जप्त; ३६ संशयित अटकेत 
 खांडवी म्हणाले, की पवारवाडी गोळीबारातील संशयित मुद्दसीर अहमद अख्तर हुसेन (वय ३३, राशीदनगर) याला तातडीने अटक केली. त्याच्या ताब्यातून १५ हजारांचे गावठी पिस्तूल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. याच गुन्ह्यातील एक संशयित आबीद उमर मुश्‍ताक याच्या कब्जातून दोन हजार ४०० रुपयांच्या दोन तलवारी जप्त केल्या. आयेशानगर भागातूनही शकील खान (रा. कामगार कॉलनी) याला अटक करून त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची धारदार तलवार जप्त केली. येवला तालुका पोलिसांनी अमोल ऊर्फ भावड्या वाघ (२४, रा. राजापूर) याच्या ताब्यातून धारदार सुरा व मोबाईल असा तीन हजारांचा ऐवज जप्त केला. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

मालेगावला पोलिसांची ऑलआउट मोहीम 
शहर व कॅम्प पोलिसांनी केलेल्या कारवाईत कमालपुरा भागात ६५ हजार रुपये किमतीच्या तीन जर्शी गायी व नामपूर रस्त्यावर केलेल्या कारवाईत बोलेरो पिक-अपसह एक गाय, एक बैल असा दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. रमजानपुरा, किल्ला, आयेशानगर पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या जुगाराच्या कारवाईत २७ संशयितांना अटक करून १४ मोबाईल, सात दुचाकी, रोख रक्कम असा सुमारे चार लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, गुलाबराव पाटील, रवींद्र देशमुख, भाऊसाहेब पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

go to top