आधी दफनविधी...नंतर अंत्यसंस्कार अन् एका मृतदेहाची हेळसांड

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र, अपघातानंतर पोलिसांनी शहानिशा न करता मृतदेह दफन केला. नंतर तोच मृतदेह पुन्हा बाहेर काढला. खेडकर कुटुंबीयांकडून तो मृतदेह रोहितचा असल्याची ओळख पटविण्यात आली. रोहितचा मृतदेह गुरुवारी मालेगावी आणून त्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक / मालेगाव : रोहित खेडकर (वय २०) याचा नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता त्याचा दफनविधी उरकल्याचा आरोप कुटुबीयांनी केला.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाच्या मृतदेहाची हेळसांड - कुटुंबीय

खेडकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सोमवारी (दि. २४) जळगाव येथे एका विवाह समारंभासाठी मालेगावहून निघाला. तो मनमाडहून रेल्वेने जळगावला जाणार होता. परंतु तो जळगाव येथे पोचलाच नसल्याचे कळले. त्यानंतर खेडकर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर मंगळवारी (दि. २५) रोहित बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ रोहन खेडकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र, अपघातानंतर पोलिसांनी शहानिशा न करता मृतदेह दफन केला. नंतर तोच मृतदेह पुन्हा बाहेर काढला. खेडकर कुटुंबीयांकडून तो मृतदेह रोहितचा असल्याची ओळख पटविण्यात आली. रोहितचा मृतदेह गुरुवारी मालेगावी आणून त्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहितच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असे कुटुंबीय आहेत.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon,s boy death body found by police Nashik Marathi News