हरणबारी धरणात 57 टक्के साठा; मात्र 'हे' धरण अद्यापही कोरडेच!

manikpunj dam.jpg
manikpunj dam.jpg

नाशिक : (मालेगाव) कसमादेसह परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने 100 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हरणबारी धरणात 670 दशलक्ष घनफूट साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस व धरणातील पाणीसाठाही समाधानकारक आहे. मात्र नांदगाव तालुक्‍यातील हे धरण अद्यापही कोरडेठाकच आहे. 

गिरणा व अन्य नद्यांना पाणी

10 जुलै 2019 ला हरणबारी धरणात अवघा तीन टक्के साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 54 टक्के अधिक साठा झाला आहे. मालेगाव तालुक्‍यात शुक्रवार (ता.10) पर्यंत 344 मिलिमीटर पाऊस झाला असून, गेल्या वर्षी 10 जुलैला फक्त 119 मिलिमीटर पाऊस झाला होता. जूनची सरासरी पावसाने कधीच ओलांडली आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी खूश असून, पिकांची स्थिती चांगली आहे. मका पिकावरील लष्करी अळीने शेतकरी त्रस्त आहेत. गिरणा व अन्य नद्यांना पाणी आले आहे. मात्र मोसम नदीला अद्यापही पूरपाणी आलेले नाही. गिरणा नदीवरील पाचही कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक साठा आहे. बहुसंख्य तलाव, पाझर तलाव, लघु व मध्यम प्रकल्पात साठा वाढला आहे. 

पुनंद धरणात 46 टक्के जलसाठा

गेली अनेक वर्षे पाण्यासाठी आसुसलेल्या दहिकुटे धरणातही समाधानकारक साठा आहे. गेल्या वर्षी (2019) चणकापूर धरणात शून्य टक्के साठा होता. या वेळी ही टक्केवारी 18 टक्के आहे. गिरणा धरणात 38 टक्के साठा असून, गेल्या वेळी 60 टक्के साठा होता. हरणबारीपाठोपाठ पुनंद धरणात 46 टक्के साठा आहे. गेल्या वेळी पुनंदमध्ये 10 जुलैअखेर अवघा चार टक्के साठा होता. नांदगाव तालुक्‍यातील माणिकपुंज धरण मात्र अद्यापही कोरडेठाक आहे. 

कसमादे धरणातील साठा
धरण - 10 जुलै 2019 - 10 जुलै 2020 

चणकापूर - 00 - 431 
हरणबारी - 30 - 670 
केळझर - 00 - 117 
नाग्या-साक्‍या - 00 - 77 
गिरणा - 1395 - 7027 
पुनंद - 00 - 597 
माणिकपुंज - 00 - 00 

कसमादे परिसरातील 10 जुलैअखेरचा 
पाऊस कंसात गेल्या वर्षीचा पाऊस 

मालेगाव-344 मिलिमीटर (119 मिलिमीटर) 
कळवण - 218 (48) 
बागलाण - 444 (103) 
देवळा - 296 (51.5) 
चांदवड - 171 (70) 
नांदगाव - 246 (54)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com