थरारक! व्हॉट्सअपने केला "त्या" कृत्याचा पर्दाफाश...नाहीतर..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

मुंबईतील बोरिवलीत राहणारे संजय श्रीपाद हातवळणे आपल्या कुटुंबीयांसोबत वर्ध्याहून विदर्भ एक्स्प्रेसच्या एस-6 या आरक्षित डब्यातून मुंबईला जात होते. त्यांनी आपल्या सर्व बॅगा सीटखाली ठेवल्या होत्या. त्यातील एका बॅगेत रोख रकमेसह सहा लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने होते. त्यानंतर...

नाशिक : पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवल्यानंतर प्रवाशाने आपली चोरीला गेलेली बॅग ओळखली आणि अवघ्या काही तासांतच सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद झाली. नागपूरहून मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसमधून रोख रकमेसह तब्बल सहा लाखांचे दागिने असलेली बॅग लंपास करणाऱ्या टोळीला मनमाड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने जेरबंद केले तसेच तिघा आरोपींची धरपकड करण्यात पोलिसांना यश आले, तर दोन आरोपी फरार आहेत.अटकेतील आरोपींमध्ये चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.

अशी घडली घटना...

मुंबईतील बोरिवलीत राहणारे संजय श्रीपाद हातवळणे आपल्या कुटुंबीयांसोबत वर्ध्याहून विदर्भ एक्स्प्रेसच्या एस-6 या आरक्षित डब्यातून मुंबईला जात होते. त्यांनी आपल्या सर्व बॅगा सीटखाली ठेवल्या होत्या. त्यातील एका बॅगेत रोख रकमेसह सहा लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने होते. गाडी मनमाडला आल्यानंतर हातवळणे यांच्या मुलीला जाग आली. तिने सामानाची तपासणी केली असता, दागिने असलेली बॅग तिला दिसली नाही. त्यामुळे तिने लगेच हा प्रकार वडिलांच्या कानावर घातला. मात्र तोपर्यंत गाडीने रेल्वे स्टेशन सोडलं होतं. संजय हातवळणे यांनी मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क करुन घडलेली घटना सांगितली. ‘तुम्ही पुढच्या पोलिस स्थानकात तक्रार दाखल करा. आम्ही इकडे तपास सुरु करतो’ असं पोलिस निरीक्षक मदने यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर हातवळणेंनी आरपीएफ ठाणे गाठलं आणि आरपीएफ इन्स्पेक्टर के. डी. लकडा यांना घटनेची माहिती दिली. दोघांनी कंट्रोल रुममध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जाताना त्यांना दिसली. त्याच्या बॅगेचा फोटो पोलिसांनी संजय हातवळणेंना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. तेव्हा ही आपलीच बॅग असल्याचं त्यांनी सांगितलं.

Image may contain: 10 people, including Pramod Gaikwad, people smiling, people standing, shoes and outdoor

हे आहेत आरोपी...

पोलिसांनी दोन पथकं करुन सापळा रचला आणि अवघ्या काही तासात आरोपींना शोधण्यात यश आले. या प्रकरणी पोलिस आणि आरपीएफ यांनी संयुक्त कारवाई करत संजय सुखदेव कापसे (रा. तामसवाडी, निफाड), संदीप बबन वानखेडे (रा. नागरदास, वाशिम) यांच्यासोबत एका सराफाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली बॅग आणि त्यातील मुद्देमाल जप्त केला. त्यांचे आणखी दोन साथीदार फरार झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि 397/34, 411 आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या 137, 147 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता
आरोपीकडून विदर्भ एक्स्प्रेसमधून चोरण्यात आलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांची ही टोळी असून त्यांनी कुठे-कुठे आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास केला जात असल्याचे रेल्वे पोलिस निरीक्षक एन. के. मदने यांनी सांगितलं.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmad Bag Ornaments Theft in Vidarbha Express at Manmad railway station Nashik Crime Marathi news