''मनमाडकरांनो, कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका''

sunil kadasane2.jpg
sunil kadasane2.jpg

नाशिक / मनमाड : कोरोनाबद्दलची मनातील भीती काढून टाका. कोरोनाला हरविण्यासाठी ज्ञान आणि काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील डॉक्टरांनी मोहल्ला क्लिनिक सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात समन्वयक म्हणून यशस्वी काम करणारे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी केले. 

काळजी घेणं महत्त्वाचं 

मनमाडमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी (ता.२१) मनमाड शहराला भेट देत डॉक्टर, राजकीय पक्ष, पत्रकार व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कडासने व त्यांच्यासोबत मालेगावहून आलेल्या डॉक्टरांनी मनमाड शहरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. कडासने म्हणाले की गंभीर प्रश्नावर मनमाडकर एकत्र येतात ही इथली खासियत आहे. डायबेटीस, शुगर, दमा, अस्थमा आदी आजार असलेल्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. 

औषधे घ्या कोरोनामुक्त व्हा 

प्रचार, प्रसार आणि कायद्याचे पालन होणं महत्त्वाचं आहे. मालेगावात अनेक ठिकाणी प्रशासन न पोहोचल्याने समन्वय साधला गेला नाही. मालेगावात वापरलेली पॉलिसी आत्मसात केल्यास कोरोना वाढणे शक्य नाही. मालेगावात यश येण्यामागे मालेगावातील नागरिकांची भूमिकाच महत्त्वाची आहे. डॉक्टरांचे तर यश आहेच. कोरोनाने कोणीही मरत नाही, वेळेवर औषधे घ्या कोरोना बरा होतो. 

मोहल्ला क्लिनिक सुरू करा 

मनमाड शहरात कोरोना रुग्णाची संख्या १६१ पोहोचल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून या पार्श्वभूमीवर आज समन्वयक कडासने व मालेगाव डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मनमाडकरांसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, डॉ. प्रवीण शिंगी, डॉ. सुनील बागरेचा, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, मयूर बोरसे, ॲड. किशोर सोनवणे, ॲड. सुधाकर मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com