आशियाई युथ वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या मुकुंदला सुवर्णपदक!

अमोल खरे  : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नाशिक : वजनदार खेळ असलेल्या वेटलिफ्टिंग खेळात राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पुन्हा एकदा मनमाड शहराला मिळाला. तो मुकुंद संतोष आहेर याच्यामुळे उझबेकिंस्थानच्या ताश्कंद येथे झालेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलेल्या मुकुंदला जागतिक सुवर्णपदक मिळाले. जागतिकस्तरावर खेळण्याची संधी आपल्या कठोर परिश्रमाद्वारे मिळविणारा मुकुंद हा पहिलाच वेटलिफ्टिंगपट्टू ठरला आहे.

नाशिक : वजनदार खेळ असलेल्या वेटलिफ्टिंग खेळात राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पुन्हा एकदा मनमाड शहराला मिळाला. तो मुकुंद संतोष आहेर याच्यामुळे उझबेकिंस्थानच्या ताश्कंद येथे झालेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलेल्या मुकुंदला जागतिक सुवर्णपदक मिळाले. जागतिकस्तरावर खेळण्याची संधी आपल्या कठोर परिश्रमाद्वारे मिळविणारा मुकुंद हा पहिलाच वेटलिफ्टिंगपट्टू ठरला आहे.

त्याच्या कष्टाचे चीज झाले
वेटलिफ्टिंग खेळ तसा ताकदीचा खेळ, एकमेकांशी झुंज देण्याचा नाही तर स्वतःशीच झुंज देत स्वतःच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा कस पाहणारा खेळ मनमाडची ओळख झाला आहे. मनमाडचे नाव पहिल्यांदा मुकुंद आहेर मुळे जागतिक पातळीवर जाऊन पोहचले. क्रीडा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात जन्माला आलेला व अवघ्या १७ वर्षाचा असलेला मुकुंद सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाची साथ यामुळे जागतिक पातळीवर पोहचला असला तरी या खड्तर प्रवासात त्याला सक्षम करणारे त्याचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे सर यांचा मोलाचा वाटा आहे. छत्रे विद्यालयात ११ वी  सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुकुंदने जय भवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. ८ वी मध्ये असल्या पासून त्याने वेटलिफ्टिंगचा सराव सुरु केला. आज त्याचे चीज झाले. घर, शाळा आणि व्यायामशाळा या पलीकडे मुकुंदने आपला वेळ खर्ची घातला नाही. सकाळ संध्याकाळ जय भवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक व्यवहारे यांच्या सोबत प्रॅक्टिस करत राहिला जिल्ह्यात, राज्यात अथवा देशात कुठेही स्पर्धा असो स्पर्धेत भाग घ्यायचा आणि सुवर्णपदक आणायचेच त्यामुळे या जागतिक स्पर्धेत १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावनारा मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे.स्थानिक उझबेकिंस्थान च्या खेळाडूची कडवी लढत मोडीत काढत मुकुंद ने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.

Image may contain: 1 person, standing and text

सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम
खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मुकुंद ने आता आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावित चांगली मजल मारली आहे निकिता काळे नंतर मुकुंद ने आंतरराष्ट्रीय आशियाई युथ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला आहे भारतासाठी पदक प्राप्त करण्याचा निर्धार निकिताने व्यक्त केला आहे तर चांगल्या सरावाच्या जोरावर मुकुंद निश्चितच पुन्हा जागतिक स्पर्धेत यशस्वी होईल. असा विश्वास त्याचे प्रशिक्षक प्रेरणास्थान असलेले प्रवीण व्यवहारे यांनी व्यक्त केला

वेटलिफ्टिंगचा प्रवास  

राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पाचवी पासून छत्रे विद्यालयात शिकत असतांना वडिलांना मल्लखांब खेळाची आवड असलयामुळे घरी मल्लखांब चे प्रशिक्षण घेत सातवीत असतांना त्याच्या वडिलांनी वेटलिफ्टिंग शिकण्यासाठी व्यवहारे सरांकडे पाठवले. प्रत्यक्षात आठवीपासून वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू झाले. सुरुवातीला जिल्हा व विभागीय स्पर्धेत यश त्यामुळे उत्साह दुणावला व इ. ९ वी ला असतांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
Image may contain: one or more people and people standing

घरची परिस्थिती बेताची असून वडील मानधनावर सुरक्षारक्षक

मागील दोन वर्षांत ४ राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन एक सुवर्ण व एक रौप्यपदक व भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेलो इंडियाची प्रती माह दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असून त्याद्वारे आहाराचा खर्च भागविला जात आहे. भविष्यात जर कोणी चांगले पुरस्कर्ते लाभले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चांगली मजल मारण्याची इच्छा आहे. कारण घरची परिस्थिती बेताची असून वडील मानधनावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात अशा गुणी खेळाडूला जर मदतीचा हातभार लाभला नक्कीच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करेल.

प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे स्वप्न उतरले सत्यात

 १९९७ पासून प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे  मनमाड शहरात वेटलिफ्टिंग खेळात खेळाडूं घडवीत आहे आजपर्यंत पाचशेच्यावर खेळाडू त्यांनी घडविले यात ४५ राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते तर शंभर सव्वाशेच्या पुढे राज्य सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत जागतिकस्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये आपले  खेळाडू खेळावे हि त्यांची पूर्वी पासूनची असलेली इच्छा निकीतानंतर मुकुंदने पूर्ण केल्याने तिच्या आई वडिलांपेक्षा व्यवहारे यांना जास्त आनंद झाला आहे मुकुंद   नक्कीच भारतासाठी पदक मिळवेल असा त्यांचा दृढ विश्वास होता मोठ्या शहरांचा मोठा गवगवा असला तरी ग्रामीण भागातही त्याच प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रशिक्षक आहे याचे उत्तम उदाहरण व्यवहारे यांच्यामुळे पुढे आले आहे शहरातील एका मुलाने जागतिक पातळी पर्यंत मजल मारली हे त्याचेच फलित आहे 

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

Image may contain: 3 people, including Omprakash Chouhan, people smiling, people standing and text

अल्पावधीतच राज्य युथ १७ वर्ष वयोगटातील स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी

२०१८ - १९ हे वर्ष मुकुंद साठी खूप महत्त्वाचे ठरले. भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४९  किलो वजनी गटात सुवर्णपदक, 

त्याच वर्षी बुलढाणा येथे झालेल्या शालेय १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक नागपूर व गौहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड,

गौहाटी येथे राष्ट्रीय शालेय स्पर्धेत चुरशीच्या स्पर्धेत रौप्यपदक, नागपूर युथ राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी,

मागील वर्षी पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड एकाच वर्षी तीन राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा बहुमान,

२०१९ - २० मध्ये यवतमाळ येथे झालेल्या १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत व औरंगाबाद येथे झालेल्या युथ स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदक व बोधगया येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुन्हा महाराष्ट्र संघात निवड,

बोधगया राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा रौप्यपदक व गौहाटी येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी पुन्हा महाराष्ट्र संघात निवड,

 यावेळेस सुवर्णपदक पटकाऊन ऐतिहासिक कामगिरी व भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड व आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निश्चितच भारतीय संघात निवड होण्याची शक्यता एवढया सगळ्या स्पर्धांना जात असतानाच इ १० वीला कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता जवळपास ९०  टक्के गुण,

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmad,s Mukund Aher got Gold Medal in Asian Youth Weightlifting Nashik Marathi News