मानूरला होणार डेडीकेटेड कोविड सेंटर ; पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा असल्याची माहिती

रविंद्र पगार
Tuesday, 29 September 2020

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणार असून, शनिवार (ता. ३)पर्यंत कळवण तालुक्यासाठी अजून एक डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू होणार आहे. त्यात पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

नाशिक / कळवण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणार असून, शनिवार (ता. ३)पर्यंत कळवण तालुक्यासाठी अजून एक डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू होणार आहे. त्यात पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ. पवार यांची माहिती 
आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. २८) कोल्हापूर फाटा येथील पंचायत समिती सभागृहात प्रशासकीय बैठक झाली. सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मिणा, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश लाड, अभोणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक बहिरम उपस्थित होते. महिन्याभरापासून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मानूर येथील कोविड केअर सेंटरजवळील इमारतीत डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू होणार आहे. तर शहरात कंटेन्मेंट झोनबाबत कडक भूमिका नसल्याबद्दल बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वतंत्र शववाहिनी अधिग्रहित करून देण्याची व्यवस्था होणार आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश लाड यांनी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आरोग्य विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, कोविड सेंटरमधील व्‍हेंटिलेटर व खाटांची संख्या वाढवावी, आरोग्य विभाग बळकट करण्याबरोबर नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा व आरोग्य यंत्रणेला पुरेशा प्रमाणात पीपीई किट, मास्‍क, सॅनिटायझर, औषधे व इतर साहित्य उपलब्धतेसाठी प्रयत्न आहेत. -नितीन पवार, आमदार  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manur will have a dedicated Covid Center nashik marathi news