#COVID19 : नाशिकमध्ये परदेशातून आतापर्यंत 'इतके' नागरिक परतले! 

corona 1.jpg
corona 1.jpg

नाशिक : कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या नागरिकांची संख्या मंगळवार (ता. 31)पर्यंत 384 पर्यंत पोचली असून, त्यात यूएईमधून आलेल्या नागरिकांची संख्या शंभर झाली आहे. त्याखालोखाल अमेरिकेतून आलेल्या नागरिकांची संख्या नोंदली गेली आहे. 

परदेशातून आतापर्यंत 384 नागरिक परतले 
महापालिकेतर्फे मंगळवारी कोरोनाविषयक माहिती प्रसिद्ध केली. कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांची संख्या 384 झाली आहे. 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले 74 नागरिक असून, आजपर्यंत 311 नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोनाग्रस्त दूषित रुग्णांच्या संपर्कात आलेले दहा नागरिक आहेत. 301 नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले आहेत. 301 नागरिकांच्या घरावर होम क्वारंटाइन स्टिकर लावली आहेत. कोरोनाग्रस्त देशांपैकी यूएईमधून 100, इटलीतून सात, इराणमधून एक, सौदीमधून तीन, जर्मनी 13, चीन दोन, यूएसए 35, यूकेमधून 34, तर इतर देशांतून 189 नागरिक नाशिकमध्ये आले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com