वैद्यकीय पथकाकडून एक लाख १२ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग...हाय रिस्क रुग्णांना बरे करण्यात पालिकेला यश

सकाळ वृ्त्तसेवा
Wednesday, 22 July 2020

शहरात कोरोनाचा बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी वैद्यकीय विभागाकडून करण्यात आल्याने आतापर्यंत तब्बल एक लाख ११ हजार ९६६ नागरिकांपर्यंत पालिकेच्या वैद्यकीय पथकाला पोहोचण्यात यश आले आहे.

नाशिक : शहरात कोरोनाचा बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी वैद्यकीय विभागाकडून करण्यात आल्याने आतापर्यंत तब्बल एक लाख ११ हजार ९६६ नागरिकांपर्यंत पालिकेच्या वैद्यकीय पथकाला पोहोचण्यात यश आले आहे. ज्या तपासण्या झाल्या त्यातील ४६ हजार २१२ हाय रिस्क तर ६५,७५४ लो रिस्क असल्याचे आढळून आल्याने हाय रिस्क रुग्णांवर तत्काळ उपचार करून त्यांना बरे करण्यात पालिकेला यश आल्याचे अहवालातून समोर आले आहे.

एका पॉझिटिव्ह रुग्णामागे २३ ते २५ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आला. एप्रिल व मे महिन्यात कोरोना निंयत्रणात होता त्यानंतर मात्र सातत्याने वाढ होत गेली. २० जुलै पर्यंत ५८८८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण जुलै महिन्यात आढळून आले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तत्काळ त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट महापालिकेने निश्चित केले होते. एप्रिल व मे महिन्यात ज्यावेळी रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते त्यावेळी संपुर्ण प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचीचं तपासणी केली गेली. जुन व जुलै महिन्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी चारशे वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढतं गेली.

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

एका पॉझिटिव्ह रुग्णामागे २३ ते २५ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले त्यानुसार २० जुलै पर्यंत ५८८८ कोरोना बाधित रुग्णांमागे ५५१७ कॉन्ट्रॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्या मागे २३ ते २५ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नुसार १ लाख ११ हजार ९६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात लो रिस्क ६५, ७५४ तर हाय रिस्क ४६,२१२ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याने कोरोनाला अटकाव करण्यात वैद्यकीय विभागाला यश आले आहे.

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

गुगल मॅपद्वारे कॉन्टॅक्ट शोधून स्वॅब टेस्टींग

पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तो ज्या भागात गेला व तेथील कोणत्या लोकांच्या संपर्कात आला याची तपासणी करून चाचण्या घेण्यात आल्या. संबंधित व्यक्तीने चुकीची माहिती दिली तरी मोबाईल च्या आधारे गुगल मॅपद्वारे कॉन्टॅक्ट शोधून स्वॅब टेस्टींग करण्यात आले. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many peoples contact tracing by medical team nashik marathi news