मंगळवारचा दिवस ठरला साक्षात 'काळ' दिवस; एकाच दिवशी चौघांच्या आत्महत्या

विनोद बेदरकर
Thursday, 14 January 2021

शहरात मंगळवारी (ता.१२) वेगवेगळ्या भागात चौघांनी आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समवेश आहे. आत्महत्येची कारण समजू शकलेली नाही. मंगळवारचा दिवस हा अक्षरश: काळ दिवस ठरला आहे.

नाशिक : शहरात मंगळवारी (ता.१२) वेगवेगळ्या भागात चौघांनी आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समवेश आहे. आत्महत्येची कारण समजू शकलेली नाही. म्हसरूळ, मुंबई नाका, सातपूर व सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूंच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. 

राहत्या घरात गळफास ​
पेठ रोडवरील राहू हॉटेल भागात राहणारे जगदीश ढवळू भुसारे (रा. विनीशा व्हिला रो हाऊस, म.बाद रोड) यांनी सोमवारी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नजीकच्या संजीवनी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात हलविले असता मृत घोषित केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत. दुसरी घटना विनयनगर भागात घडली.

सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद

अनिलकुमार विजयकुमार सिंग (४७, रा. अश्विनी अर्पा.) यांनी मंगळवारी राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला शाल बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार बबन शिंदे करीत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

पंख्यास ओढणी बांधून गळफास

औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणाऱ्या शिरीन विलाल शेख (२४, रा. बुद्धविहार समोर) या महिलेने मंगळवारी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबीयांनी तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलिस नाईक सिध्दपुरे करीत आहेत.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

हॉटेल खाली तो अत्यवस्थ अवस्थेत

चौथ्या घटनेत कॉलेजरोड भागातील पाटील लेन. नं. ३ मध्ये राहणारे आश्विनकुमार आनंदीलाल वर्मा (२३ रा.पटवर्धन अपा.) या युवकाने सोमवारी शरणपूररोड भागात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. सप्तशृंगी बिल्डींगमधील पतंग हॉटेल खाली तो अत्यवस्थ अवस्थेत मिळून आल्याने त्याच्यावर पंडित कॉलनीतील सुश्रुत हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many suicides cases in nashik marathi news