लस येईपर्यंत मास्क हीच लस - छगन भुजबळ

योगेश मोरे
Saturday, 5 December 2020

आपलेच काय, तर जगचे लक्ष लसकडे लागले आहे. कोरोनाची लस नक्कीच येणार आहे. पण जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत मात्र मास्क हीच आपली लस आहे

म्हसरूळ (जि.नाशिक) : आपलेच काय, तर जगचे लक्ष लसकडे लागले आहे. कोरोनाची लस नक्कीच येणार आहे. पण जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत मात्र मास्क हीच आपली लस आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

क्रेडाई नाशिक मेट्रो, नरेडको नाशिक व महापालिकेतर्फे मास्कवाटप 
क्रेडाई नाशिक मेट्रो, नरेडको नाशिक व महापालिकेतर्फे कोविडच्या पार्श्‍वभूमीवर पंचवटी कार्यालयात मास्क व सॅनिटाइझर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त कैलास जाधव, अभय तातेड, रवी महाजन, सुरेश पाटील, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे आदी उपस्थित होते. 
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की क्रेडाई आणि नरेडकोला हाक मारली आणि ते धावून आले. ठक्कर डोम येथे अपेक्षेपक्षा चांगले कोविड सेंटर उभारले. महापालिका रुग्णालयाला पाच डिजिटल मशिन, ऑक्सिमीटर आदींसह यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. परप्रांतीयाना मोफत शिधा देण्यासह अनेक उपक्रमात पुढाकार घेताना आता दुर्बल घटकांसाठी मास्क आणि सॅनिटाइझरचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

आगामी काळातही संकटाच्या काळात धावून याल

दिवाळीत फटाक्याचे प्रदूषण टाळून त्यावरील खर्च वाचवून गरजू लोकांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद दिल्याचे अभय तातेड यांनी सांगितले. आयुक्त जाधव नरेडको आणि क्रेडाईतर्फे सामाजिक बांधिलकी जपली. आगामी काळातही संकटाच्या काळात धावून याल, अशी अपेक्षा व्यक्त केली.  
हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mask is vaccine until the vaccine arrives said chhgan bhujbal nashik marathi news