चार महिन्यांत ‘समृद्धी’च्या कामावरून लाखोंच्या साहित्याची चोरी; गुन्हा दाखल

Material theft worth 15 lakhs on construction of Samrudhi Highway
Material theft worth 15 lakhs on construction of Samrudhi Highway

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्र. १२ अंतर्गत दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे उपठेकेदार म्हणून काम करणाऱ्या कंपनीला लॉकडाउनच्या काळात चोरट्यांनी तब्बल १५ लाख ६२ हजार रुपयांना चुना लावला आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गेल्या चार महिन्यांच्या काळात चोरी झाल्याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

एप्रिल २०१९ पासून हे काम सुरू

सूरज गुप्ता (३०, रा. इगतपुरी) यांची भागीदार विजय राठोड यांच्यासमवेत एमरल्ड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. समृद्धी महामार्गाच्या टप्पा १२ अंतर्गत अंडरपास व बॉक्स कलवर्टरचे बांधकाम करण्यासाठी गुप्ता यांनी दिलीप बिल्डकॉनसोबत करार केला आहे.एप्रिल २०१९ पासून हे काम सुरू आहे. या  कामासाठी लागणाऱ्या वस्तू (सेंटरिंग मटेरियल) दिलीप बिल्डकॉनने वापरण्यासाठी दिल्या होत्या. माळवाडी व निऱ्हाळे शिवारात पुलाचे काम सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे कामावरील परप्रांतीय मजूर मार्चच्या शेवटी त्यांच्या गावाकडे निघून गेले.

कामावर पडलेले साहित्यदेखील मजुरांअभावी तसेच पडून राहिले, तसेच लॉकडाउनमुळे साइटवर जाणे ठेकेदारांना अशक्य बनले होते. टप्प्याटप्प्याने बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. हे काम शेवटच्या टप्प्यात आल्यावर दिलीप बिल्डकॉन कंपनीने दिलेले साहित्य त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, काम सुरू होण्यापूर्वी घेतलेले साहित्य व प्रत्यक्ष जमा होणारे साहित्य यामध्ये मोठी तफावत दिसून आली.

१५ लाखांच्या साहित्याची चोरी 

चार महिन्यांत कामावरून १५ लाख ६२ हजार २०० रुपये किमतीचे विविध प्रकारचे लोखंडी बांधकाम साहित्य, हेडलाइट, पाण्याच्या टाक्या, कॉपर केबल आदी साहित्याची चोरी करण्यात आली. याबाबत वावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ
 
रिपोर्ट - राजेंद्र अंकार
 
संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com